गुरुदत्त यांच्या ‘साहेब, बीवी और गुलाम’ चित्रपटातील मीना कुमारी यांनी साकारलेली ‘छोटी बहू’ची भूमिका चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानली जाते. पण, फार कमी लोकांना माहित आहे की, जेव्हा मीना कुमारी यांना चित्रपटाच्या भूमिकेसाठी विचारले होते, तेव्हा त्यांनी चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला होता.
ज्यावेळेस चित्रपटातील कलाकारांची निवड करण्याची वेळ आली तेव्हा केवळ मीना कुमारीच चित्रपटातील ‘छोटी बहू’च्या भूमिकेस न्याय देऊ शकतात, असे गुरुदत्त यांना वाटले. ” मीना कुमारी यांच्या हातातून जवळजवळ हा चित्रपट निसटलाच होता? गुरुद्त्त यांनी एका प्रस्तावाद्वारे आपल्याला मीना कुमारी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले होते?  पण, त्या इतर चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी या भूमिकेस नाकार दिला”, असे ‘मीना कुमारीः द क्लासिक बायोग्राफी’ पुस्तकाचे लेखक, वरिष्ठ पत्रकार विनोद मेहता यांनी लिहले आहे. ‘हार्पर कोलिंस इंडिया’ने पहिल्यांदा १९७२ साली या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. परंतु, १ ऑगस्टला मीना कुमारी यांच्या ८१व्या जयंतीच्या औचित्यानिमित्त मेहता यांनी पुस्तकाच्या दुस-या भागाचे संस्करण करण्याचा निर्णय घेतला.
गुरुदत्त यांनी लंडनमध्ये राहणा-या एका अभिनेत्रीला चित्रपटामध्ये याच भूमिकेसाठी घेतले. पण, त्या पूर्णपणे भूमिकेसाठी अनुपयुक्त ठरल्या. त्यानंतर, गुरुदत्त यांनी छोटी बहू या भूमिकेशिवाय पूर्ण चित्रपटाचे १९६२पर्यंत चित्रिकरण पूर्ण करून घेतले. मेहता यांच्यानुसार, ” मीना कुमारींसोबत पुन्हा एकदा संभाषण करण्यात आले आणि यावेळेस ते यशस्वी राहिले. त्यांनी लागोपाठ ४५ दिवस या चित्रपटासाठी चित्रिकरण केले आणि त्यांचे मानधनही २५ टक्क्यांनी वाढविण्यात आले. मीना कुमारी यांनी खूप सुंदर पद्धतीने चित्रपटातील पतिच्या उपेक्षेला बळी पडलेल्या पीडित पत्नीची भूमिका साकारली. जी आपल्या व्यभिचारी पतीला खुश करण्यासाठी दारुदेखील पिते. दुर्भाग्याने दारु पिण्याच्या याच सवयीमुळे त्यांचे वयाच्या ३९व्या वर्षीच निधन झाले. या चित्रपटामुळे त्यांची ‘ हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेटी क्वीन’ म्हणून ओळख निर्माण झाली. पण, या विशेषणास मीना कुमारी यांनी जास्तच गंभीरतेने घेतले. त्यांच्यासाठी देखील ही भूमिका निभावणे सोपे नव्हते.
मेहता यांनी मीना कुमारींच्या डायरीतील एक वाक्य मांडले आहे. ज्यात लिहले आहे की, ” चित्रपटातील छोटी बहूची भूमिका मला अडचणीत आणत आहे. छोटी बहूचे दुःख, आशा, दारुण स्थिती, सहनशीलता, हास्य, तिच्या अनेक गोष्टींमुळे मी कंटाळले आहे.”
पुस्तकाचा सर्वाधिक भाग मीना कुमारींच्या वैयक्तिक जीवनावर केंद्रित करण्यात आला असून त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी आणि प्रेमसंबंधांबाबत यामध्ये लिहले आहे. कमाल अमरोही यांच्यासोबत त्यांचे १२ वर्षांचे लग्नसंबंध तुटण्यामागचे कारण दोघांमधील अहंकार असल्याचे मेहता यांनी सांगितले आहे.