बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. यांची जोडी ही बॉलिवूडमधी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नसीरुद्दीन आणि रत्ना यांनी १९८२ मध्ये लग्न केलं. दोघे ही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. नसीरुद्दीन हे मुस्लिम आणि रत्ना या हिंदू असल्याने नसीरुद्दीन यांच्या आईने एक प्रश्न विचारला होता. रत्ना लग्नानंतर धर्म बदलणार आहे का? असा प्रश्न त्यांनी नसीरुद्दीन यांना विचारला होता. नसीरुद्दीन यांनी दिलेल्या उत्तराने सगळ्यांची मने जिंकली होती.

आईच्या प्रश्नावर उत्तर देत नसीरुद्दीन म्हणाले. नाही ती धर्म बदलणार नाही. माझी आई एक पुराणमतवादी कुटुंबातील होती, तिचं शिक्षण झालं नाही, ती दिवसात ५ वेळा नमाज करायची आणि ती आयुष्यभर उपवास करत राहिली. ती म्हणायची, आपल्या बालपणात ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात त्या आपण कशा बदलू शकतो? एखाद्याचा धर्म बदलणे योग्य नाही.’

नसीरुद्दीन पुढे म्हणाले, ‘आम्ही आमच्या मुलांना प्रत्येक धर्माबद्दल सांगितलं आहे, मात्र त्यांचा धर्म कोणता आहे हे आम्ही त्यांना कधीही सांगितलं नाही. मला वाटतं की धर्माबद्दल लवकरच सकारात्मक बदल होतील. माझ्या मते मी लग्न केलेली हिंदू स्त्री ही सगळ्यांसाठी उत्तम उदाहरण आहे.’.

नसीरुद्दीन आणि रत्ना यांची भेट सत्यदेव दुबे यांच्या नाटका दरम्यान झाली होती. एका मुलाखतीत रत्ना यांनी त्यांच्या पहिल्यांदा कसे भेटले ते सांगितलं. “सत्यमेव दुबे यांनी आमची ओळख करून दिली. यावेळी आम्हाला एकमेकांन विषयी काहीच माहित नव्हतं. मला त्यांचं नावसुद्धा माहित नव्हतं. पहिल्या दिवशी आम्ही भेटलो. दुसर्‍या दिवशी आमची मैत्री झाली आणि मग आम्ही बऱ्याच वेळा एकत्र फिरू लागलो,” असे रत्ना म्हणाल्या.

नसीरुद्दीन आणि रत्ना यांना दोन मुलं आहेत. इमाद शाह आणि विवान शाह असे त्यांचे नाव आहे. हे दोघे ही अभिनेते आहेत.

आणखी वाचा : नाइट क्लबमध्ये पार्टीसाठी गेलेल्या प्रियांकाच्या मागे लागली लेस्बियन आणि…

दरम्यान, ‘रकसम’ ही नसीरुद्दीन यांचा शेवटचा चित्रपट होता. हा सिनेमा झी5वर रिलीज झाला होता. याशिवाय ते ‘बंदिश बँडिट्स’ या वेब शोमध्ये दिसले होते.