News Flash

5 स्टार हॉटेलमधून पंकज त्रिपाठीने मनोज वाजपेयीची चोरली चप्पल अन्…

जाणून घ्या नंतर काय घडलं...

पंकज त्रिपाठी हे नाव आता बॉलिवूडमध्ये परिचयाचं झालं आहे. ‘मसान’पासून ‘मिर्झापूर’पर्यंत अनेक चित्रपट, सीरिजमध्ये काम करत पंकज यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ते एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करत होते.

एका शोमध्ये पंकज त्रिपाठी यांनी हॉटेलमध्ये काम करतानाचा मजेशीर किस्सा सांगितला आहे. ज्या ५ स्टार हॉटेलमध्ये ते काम करत होते तेथे एकदा अभिनेते मनोज वाजपेयी आले होते. पंकज यांना मनोज वाजपेयी यांना भेटायचे होते. पण पंकज त्रिपाठी यांनी असे काही केले की मनोज वाजपेयी यांनी स्वत: त्यांना भेटायला बोलावले.

पाहा : एक छोट्या रुममध्ये राहणारे पंकज त्रिपाठी आता राहतात मुंबईमधील पॉश एरियामध्ये

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

त्यावेळी मनोज वाजपेयी दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. दरम्यान ते पंकज त्रिपाठी काम करत असलेल्या हॉटेलमध्ये राहत होते. मनोज वाजपेयी यांना भेटण्यासाठी पंकज त्रिपाठीने त्यांची चप्पल चोरली होती. मनोज वाजपेयी रुम बाहेर जाताना चप्पल शोधत होते. त्यांना चप्पल मिळाली नाही. त्यांनी हाउसकिपिंग स्टाफला तेथे बोलावले. तेव्हा पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की तुम्हाला भेटता यावे म्हणून मी चप्पल चोरली होती. मनोज वाजपेयीने ती चप्पल पंकज त्रिपाठी यांना भेट म्हणून दिली होती. हा किस्सा पंकज त्रिपाठी यांनी ‘कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 5:24 pm

Web Title: when pankaj tripathi stole manoj bajpayees slippers from the 5 star hotel avb 95
Next Stories
1 सुशांतच्या फोटवर RIP लिहण्याची हिंमत झाली नाही; अंकिताने केला खुलासा
2 गंगुबाई काठियावाडी वादांच्या भोवऱ्यात, आलिया आणि संजय लीला भन्साळीला न्यायालयाने बजावले समन्स
3 आलियाच्या आईचा थेट उद्धव आणि आदित्य ठाकरेंना सवाल; म्हणाल्या, “लस आधी…”
Just Now!
X