24 January 2021

News Flash

जेनेलियाला फोटोग्राफर्सने वहिनी म्हणून आवाज दिला अन्…

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके आणि क्यूट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ओळखले जातात. लग्नानंतर जेनेलिया चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी ती अनेक वेळा पती रितेशसोबत फिरताना दिसते. अनेकदा ती रितेशसोबचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या जेनेलिया आणि रितेशच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

नुकताच जेनेलिया-रितेशने सारा अली खान आणि वरुण धवनचा आगमी चित्रपट ‘कूली नंबर १’ चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्ये हजेरी लावली. दरम्यान जेनेलियाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि चेक्सचा स्कर्ट परिधान केला होता. या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. तर दुसरीकडे रितेश एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत होता. तसेच त्याचे सन ग्लासेस चाहत्यांना विशेष आवडले.

 

View this post on Instagram

 

#geneliadeshmukh and #riteshdeshmukh today for #coolieno1 completion bash #ViralBhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आणखी वाचा : जेनेलियाचा ‘टिक-टॉक’वर जलवा; हे भन्नाट व्हिडीओ पाहाच

जेव्हा रितेश आणि जेनेलियाने या पार्टीला हजेरी लावली तेव्हा फोटोग्राफर्सची नजर त्यांच्यावर पडली. तेव्हा जेनेलिया फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोज देत होती. पोज देत असताना फोटोग्राफर गंमतीने तिला जेनेलिया वहिनी असा आवाज देत होते. ते ऐकून जेनेलियाला हसू आलं आणि ती तेथून निघून गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 6:08 pm

Web Title: when photographers call genelia as genelia vahini avb 95
Next Stories
1 सारा अली खानने केली गंगा पूजा, फोटो व्हायरल
2 ‘मन फकीरा’ची टीम रस्त्यावर; नेमकं काय आहे प्रकरण
3 ‘भारतीय लोकांकडून मिळालेल्या…’, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्सवर इव्हांकाचे उत्तर
Just Now!
X