बॉलिवूडमधल्या ‘देसी गर्ल’सोबत म्हणजेच प्रियांका चोप्रासोबत तीन वेळा डेटवर गेल्यानंतर निक जोनासने त्याच्या आईला फोन करून सांगितलं की, “मला माझी जोडीदार मिळाली.” त्या घटनेच्या दोन महिन्यांतच ग्रीसमध्ये असताना निकने प्रियांकाला लग्नासाठी प्रपोज केलं. १ डिसेंबर २०१८ मध्ये या दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली. प्रियांका-निकच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण असून प्रियांकाने अनेक मुलाखतींमध्ये निक व त्याच्या कुटुंबीयांविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने चक्क बेडरुम सिक्रेट सांगितलं.
‘ईटी ऑनलाइन’ला दिलेल्या या मुलाखतीत ती म्हणाली होती, “हे खरंच खूप त्रासदायक आहे, पण रोज सकाळी उठल्यावर निक माझा चेहरा सर्वांत आधी पाहण्याचा आग्रह धरतो. झोपेतून उठल्यावर किमान मला तोंड धुवू दे किंवा एखादा मॉइश्चराइजर तरी लावू दे असं माझं म्हणणं असतं. पण ही तितकीच गोड गोष्ट आहे. पतीने सकाळी उठल्यावर सर्वांत आधी आपला चेहरा पाहावा अशी अनेकांची इच्छा असते.”
View this post on Instagram
डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरमध्ये प्रियांका-निकचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. २०१७ पासून दोघं एकमेकांना डेट करत होते. ‘मेट गाला’च्या इव्हेंटमध्ये निक आणि प्रियांका पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. अखेर १८ ऑगस्टला या दोघांनी आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 1, 2020 10:45 am