30 October 2020

News Flash

अभिनेत्यासोबत लीप लॉक सीनमुळे चर्चेत आला होता रणदीप हुड्डा

सोशल मीडियावर व्हिडीओ झाला होता व्हायरल

आपल्या दमदार अभिनय कौशल्यामुळे चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. उत्तम अभिनयशैली आणि भूमिका निवडतानाचा चोखंदळपणा यामुळे रणदीपकडे आज बॉलिवूडचा ‘रफ अँण्ड टफ हिरो’ म्हणून पाहिलं जातं. बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारा रणदीप अनेक वेळा या ना त्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. एका चित्रपटामुळे तो विशेष चर्चेत आला होता. या चित्रपटामध्ये रणदीपने त्याच्या सह कलाकार अभिनेत्यासोबत लीप लॉक सीन दिल्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली होती.

ऑस्ट्रेलियामध्ये एमबीएचं शिक्षण घेतल्यानंतर एका विमान कंपनीमध्ये काम करत असताना रणदीपला मॉडेलिंग करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळलेल्या रणदीपने दिल्लीतील थिएटरमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शिका मीरा नायर यांनी रणदीपचा अभिनय पाहिला आणि त्याला बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ब्रेक दिला. २००१ साली ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रणदीपने या चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले. मात्र त्याचे ‘जिस्म २’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ हे चित्रपट विशेष चर्चिले गेले. या दोन्ही चित्रपटांमध्ये रणदीपने बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले.

‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटात रणदीपने एका समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याला सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन करायचा होता. त्याच्या या सीननंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. त्यासोबतच या सीनचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 9:36 am

Web Title: when randeep hooda created sensation with his bold scenes ssv 92
Next Stories
1 अनुभवातून शिकणे हेच जगणे!
2 सीबीआय पथक आज मुंबईत?
3 बाईकवरुन स्टंट करताना अभिनेत्याचा अपघात; कोट्यवधींचा सेट जळून खाक
Just Now!
X