20 January 2018

News Flash

या अभिनेत्याच्या किसने वरुणही लाजला

त्याच्या या सततच्या किस करण्यामुळे वरुण चांगलाच लाजेने लाल झाला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 12, 2017 8:00 PM

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग जिथे जातो तिथे एखादी हास्यास्पद घटना घडणार नाही असं तर होणे नाहीच. तो कुठेही गेला तरी प्रसारमाध्यमांचं लक्ष स्वतःकडे कसं खेचून घ्यायचं हे तो पुरेपूर जाणतो. काही दिवसांपूर्वीच तो अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या ‘टॉयलेट’मध्ये घुसला होता. तो भूमीच्या टॉयलेटमध्ये का गेलेला याचं स्पष्टिकरणंही त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून दिलं आहेत. तो या व्हिडिओमार्फत ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ सिनेमाचे आपल्यापरिने प्रमोशन करत होता.

त्या व्हिडिओमधील पागलपंतीमधून रणवीरचे चाहते बाहेर पडत नाहीत तोवर त्याचे अजून काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्याच्या या फोटोंमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आणि ट्रेण्डमध्ये आला आहे. त्याने चक्क प्रसारमाध्यमांसमोरच अभिनेता वरुण धवन याला किस केल. रणवीरने जेव्हा वरुणला किस केले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भावच सारे काही सांगून जात होते.

त्याच्या या सततच्या किस करण्यामुळे वरुण चांगलाच लाजेने लाल झाला होता. प्रसारमाध्यमांसमोरच हे सारं काही होत असल्यामुळे त्यांना आता काय उत्तर द्यावं हा प्रश्न त्याच्या मनात येत असेल. पण याचा कोणताही परिणाम रणवीर झाला नाही. तो आपलं वरुणसाठी असणारं प्रेम व्यक्तच करत राहिला. ‘मी प्रेम अशाच पद्धतीने दाखवतो,’ असं बोलून तो मोकळा झाला.

मेहबूब स्टुडिओमध्ये सध्या दोघांच्या वेगवेगळ्या सिनेमांचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरणाला जात असतानाच या दोघांच्या गाठी- भेटी झाल्या. नुकताच वरुणने त्याच्या जुडवा २ सिनेमाचे चित्रीकरण संपवले. डेव्हिड धवन दिग्दर्शित जुडवा या सिनेमाचा हा सिक्वल आहे. या सिक्वलमधअये खुद्द सलमान खान पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री करिष्मा कपूरही झळकण्याची शक्यता आहे.

वरुण ‘जुडवा-२’ व्यतिरिक्त सुजीत सरकारच्या ‘ऑक्टोबर’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये सध्या व्यग्र आहे. तर रणवीर सिंग ‘पद्मावती’ सिनेमासाठी घाम गाळत आहे. या सिनेमात तो अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित सिनेमात दीपिका पादुकोण आणि शाहीद कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

First Published on August 12, 2017 8:00 pm

Web Title: when ranveer singh kiss attack made varun dhawan blush view photos
  1. No Comments.