अभिनेते अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे अफेअर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाजले होते. १९७६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दो अनजाने’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांचे अफेअर सुरु झाले असे म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी लग्न केल्यानंतर रेखा आणि अमिताभ यांच्या नात्यात दुरावा आला. आता रेखा यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांचा फोटो पाहून रेखा यांची प्रतिक्रिया कशी होती हे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ बॉलिवूड फोटोग्राफर विरल भय्यानीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ २०१९मधील एका कॅलेंडर लाँच इवेंट दरम्यानचा आहे. फोटोग्राफर डब्बू रतनानीने कॅलेंडर लाँच करण्यासाठी एक इवेंट आयोजित केला होता. त्यावेळी रेखा यांनी तेथे हजेरी लावली होती.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये रेखा या फोटोग्राफरला पोज देताना दिसत आहे. दरम्यान त्या मागे भींतीवर अडकवलेल्या फोटोंकडे पाहतात. तेथे अमिताभ बच्चन यांचा फोटो असतो. हे पाहून रेखा यांनी फोटोग्राफरला थांबण्यास सांगितले आणि त्या दुसऱ्या ठिकाणी येऊन उभ्या राहिल्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी रेखा यांनी ‘इंडियन आयडल १२’मध्ये हजेरी लावली होती. शोच्या सूत्रसंचालक जय भानुशाली जेव्हा लग्न झालेल्या पुरुषांच्या प्रेमात पडण्याबाबत बोलत असतो तेव्हा रेखा यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या. “तुम्ही एखादी अशी महिला पाहिली आहे जी एका पुरुषाच्या प्रचंड प्रेमात आहे तेही विवाहित पुरुषाच्या?” जयचा प्रश्न संपताच रेखा यांनी “मला विचारा ना” अशी पटकन प्रतिक्रिया दिली. यावर जयने पुन्हा त्यांना काय म्हणालात असं विचारताच रेखां यांनी मिश्किल अंदाज मी “काहिच म्हणाले नाही” असं म्हणतं पुन्हा उत्तर देणं टाळलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2021 10:36 am