02 March 2021

News Flash

जेव्हा रेखा-काजोल यांच्या बोल्ड फोटोशूटची झाली जोरदार चर्चा

हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

रेखा आणि काजोल

चित्रपटसृष्टी व त्यातील कलाकार यांचा प्रेक्षकांवर फार परिणाम होत असतो. पडद्यावर विविध भूमिका साकारणारे कलाकार हे प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा बराच प्रभाव पाडत असतात. म्हणूनच सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या प्रतिमेविषयी फार जागरूक असतात. सध्या सोशल मीडियावर आपली कशी प्रतिमा निर्माण होतेय, याचा सेलिब्रिटी फार विचार करत असतात. पूर्वी सेलिब्रिटींच्या विविध मुलाखती, फोटोशूट, जाहिराती यांची फार चर्चा व्हायची. चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री रेखा व काजोल एका बोल्ड फोटोशूटसाठी चर्चेत आल्या होत्या.

१९९६ मध्ये दोघींनी हा फोटोशूट केला होता आणि त्यावेळी त्याची तुफान चर्चा झाली होती. रेखा आणि काजोल यांचा एकाच स्वेटरमधला इंटिमेट पोझ देतानाचा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली होती. एका मासिकाच्या कव्हर फोटोसाठी त्यांनी हा फोटोशूट केला होता.

rekha and kajol छायाचित्र सौजन्य- पिंकविला

आणखी वाचा : प्रिती झिंटाने १०-१५ वेळा नाही, तर तब्बल इतक्या वेळा केली करोना चाचणी

१९९२ मध्ये काजोलने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि १९९६ मध्ये या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती. रेखा यांच्यासाठी मात्र हा वाद काही नवीन नव्हता. या फोटोशूटनंतर काजोलने कुठल्याच वादात न अडकण्यासाठी आटोकाठ प्रयत्न केले. आजही काजोल इंडस्ट्रीतील सर्व वादविवादांपासून लांबच राहणं पसंत करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 11:13 am

Web Title: when rekha kajol bold photoshoot was talk of the town ssv 92
Next Stories
1 ‘केआरकेला व्हायचंय मुलगी’; ट्विटमुळे होतेय सोशल मीडियावर चर्चा
2 थाटात पार पडलं चिरंजीवी सरजाच्या पत्नीचं डोहाळ जेवण; दिराने दिलेल्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा
3 प्रिती झिंटाने १०-१५ वेळा नाही, तर तब्बल इतक्या वेळा केली करोना चाचणी
Just Now!
X