News Flash

‘काम मिळवण्यासाठी सारानं अक्षरश: माझ्यापुढे हात जोडले’, रोहित शेट्टीने केला होता खुलासा

रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटात साराने काम केले आहे.

रोहित शेट्टीने एका कार्यक्रमात याचा खुलासा केला होता.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे सारा अली खान. तिने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तिने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा चाहता वर्ग मात्र मोठा आहे. पण सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी असताना देखील तिने काम मिळवण्यासाठी रोहित शेट्टीकडे विनंती केली होती. रोहित शेट्टीने एका कार्यक्रमात याचा खुलासा केला होता.

साराने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये सारा अली खान, रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग गेले होते. त्यावेळी रोहित शेट्टीनं साराची निवड कशी झाली याचा भन्नाट किस्सा सांगितला. काम मिळवण्यासाठी सारानं मला खूप मेसेज केले होते. शेवटी कंटाळून मी तिला भेटायला बोलावलं. साराच्या घरातील प्रत्येक व्यक्ती सेलिब्रिटी आहेत. ती स्टार किड आहे. त्यामुळे भेटायला येताना चार पाच बॉडीगार्ड, मॅनेजर असा लवाजमा घेऊन ती येईल असं मला वाटलं. मात्र ती एकटीच आली होती. ती एकटीच आली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला भेटायला आल्यावर अक्षरश: हात जोडून तिनं काम मागितलं असे रोहित म्हणाला.

आणखी वाचा : ‘कधी विचारही केला नव्हता…’, रस्त्यातच उतरलेल्या विमानाचा व्हिडीओ शेअर करत प्रीति म्हणाली

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

पुढे तो म्हणाला, तिचा तो सच्चेपणा मला एवढा भावला की माझे डोळे पाणावले. सैफ अली खानची मुलगी असतानाही काम मिळवण्यासाठी ती करत असलेली धडपड मला खूप आवडली. तिला चित्रपटात काम द्या असं सांगायला मला ना सैफनं फोन केला ना अमृता सिंगनं. तिनं काम मिळवण्यासाठी स्वत: धडपड केली हे मला खूप जास्त आवडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 4:46 pm

Web Title: when sara ali khan asked for work with folded hands in front of rohit shetty avb 95
Next Stories
1 थुकरट वाडीचे विनोदवीर आता मुंबईमध्ये शूटिंगसाठी सज्ज
2 चित्रीकरणादरम्यान सर्वांसमोर ‘या’ अभिनेत्याने केलं निया शर्माला प्रपोज
3 मनोज वाजपेयीची पत्नी शबानावर नाव बदलण्यासाठी टाकण्यात आला होता दबाव
Just Now!
X