News Flash

“माझ्या सारख्या स्टारसोबत लग्न करशील?”, जेव्हा शाहरुख खानने प्रियांका चोप्राला विचारला प्रश्न!

त्यावेळी १७ वर्षांची असणाऱ्या प्रियांकाने बिनधास्त उत्तर दिलं होतं.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि किंग खान शाहरुख ‘डॉन’ ‘सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमातील शाहरुख आणि प्रियांकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. मात्र प्रियांकाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यापूर्वीच शाहरुखने प्रियांकाला एक हटके प्रश्न विचारला होता. “माझ्या सारख्या हिंदी स्टारसोबत लग्न करशील का?” असा प्रश्न शाहरुखने प्रियांका चोप्राला विचारला होता. यावेळी प्रियांका फक्त १७ वर्षांची होती. मात्र अजिबात न डगमगता प्रियांकाने देखील किंग खानच्या या प्रश्नाला उत्तर दिलं होतं.

ज्यावेळी प्रियांका चोप्रा मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती त्यावेळेचा हा किस्सा आहे. या स्पर्धेवेळी प्रश्नोत्तरांच्या फेरी दरम्यान शाहरुखने प्रियांकाला प्रश्न विचाराला होता. तो म्हणाला, ” कल्पना कर जर यापैकी कुणाशी तुला लग्न करायचं असेल तर तो कोण असले. अजहरभाई सारखा खेळाडू जो तुला संपूर्ण जगाची सफर घडवेल? ज्याचा संपूर्ण देश गर्व करेल आणि तुझी मानही गर्वाने उंचावेल?”

पुढे शाहरुखने तिला विचारलं, ” की तू स्वारोवस्की सारख्या बिझनेसमन सोबत लग्न करशील जो तुला सुंदर महागडे दागिने देईल की तू माझ्या सारख्या हिंदी फिल्म स्टारसोबत लग्न करशील ज्याच्याकडे तुला वेगवेळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्याशिवाय काहीच नाही?.”

तर प्रियांकाने उत्तर देण्याआधीच किंग खान म्हणाला, ” तू काही उत्तर दिलं तरी तुझ्या गुणांवर काही परिणाम नाही होणार. शिवाय अजहर भाई आणि स्वारोवस्की यांना देखील वाईट वाटणार नाही.”

शाहरुखच्या या गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नावर त्यावेळी १७ वर्षांची असणाऱ्या प्रियांकाने बिनधास्त उत्तर दिलं होतं. ती म्हणाली, “जर मला कुणाची निवड करायची असती तर मी नक्कीच एका भारतीय क्रिकेटरची केली असती. कारण जेव्हा तो घरी आला असता तेव्ही मी म्हणाले असते की संपूर्ण देशाप्रमाणेच मला त्याचा गर्व आहे. तुम्ही देशासाठी बेस्ट केलं आणि तुम्ही बेस्ट आहात हे बोलण्याची मला संधी मिळाली असती.” असं प्रियांका म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 11:48 am

Web Title: when shaharukh khan asked priyanka chopra that she would marry star like him actress reaction kpw 89
Next Stories
1 बलात्कार केल्याचा मॉडेलचा आरोप; प्रसिद्ध फोटोग्राफरविरुद्ध मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा
2 विनोदी अभिनेता भूषण कडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीचा करोनामुळे मृत्यू
3 अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या नावावर करणी सेनेचा आक्षेप, सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी
Just Now!
X