News Flash

‘या’ विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात होती शिल्पा शेट्टी, पत्नीला कळाले अन्…

शिल्पाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता.

बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी चित्रपटामुळे तर कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे. कलाकार हे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. ती सतत चाहत्यांसोबत व्हिडीओ शेअर करताना दिसते. एकेकाळी शिल्पाचे खासगी आयुष्य चर्चेचा विषय ठरले होते. तिचे नाव एका विवाहित दिग्दर्शकाशी जोडले जात होते.

९०च्या दशकात शिल्पा अक्षय कुमारला डेट करत होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर शिल्पाचे नाव दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याशी जोडले जात होते. त्या दोघांची ओळख ‘दस’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी अनुभव हे विवाहित असून ते एका मुलाचे वडील होते.

आणखी वाचा : ‘त्याने माझा वापर केला आणि सोडून दिलं’, शिल्पा शेट्टीने केला होता खुलासा

त्यावेळी अभिनव यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या होत्या आणि शिल्पा शेट्टी ही त्यांच्या प्रेमात असल्याचे शिल्पाच्या जवळच्या व्यक्तीने म्हटले होते. शिल्पाच्या कुटुंबीयांना शिल्पाने अनुभव यांना डेट करणे आवडत नव्हते. शिल्पाने एका मुलाखतीमध्ये याबाबत वक्तव्य केले होते. या सर्व अफवा असल्याचे तिने म्हटले होते.

दरम्यान अनुभव सिन्हा यांची पत्नी रत्ना यांना याबाबत कळताच वाद झाला होता. रत्ना यांनी शिल्पावर अनेक आरोप केले होते. २००७मध्ये शिल्पा ‘बिग ब्रदर’ या यूकेच्या शोमध्ये सहभागी झाली होती. ती हा शो जिंकली आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 3:46 pm

Web Title: when shilpa shetty was in love with dus director anubhav sinha avb 95
Next Stories
1 नेहा पेंडसेने ‘भाभी जी घर पर है’ मालिकेचा निरोप घेतला? नेहाने दिली प्रतिक्रिया
2 तेजस्विनी पंडितचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण
3 गरिबांना बिस्कीट वाटपाच्या व्हिडीओमुळे ट्रोल झाली सोनल चौहान; ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचा होतोय आरोप
Just Now!
X