News Flash

अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना करणाऱ्या चाहत्याला सोनू सूदचे भन्नाट उत्तर

सोनू सूद सोशल मीडियाद्वारे अनेकांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो.

सोनू सूद

बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद प्रवासी मजदूरांसाठी एक सुपरस्टार ठरला आहे. त्याने लाखो लोकांना त्यांच्या घरी पोहोचवले तर दुसरीकडे करोनामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या लोकांना जमेल त्या पद्धतीने मदत करत देशातील लोकांची मने जिंकली आहेत. आज या सुपरस्टारचा वाढदिवस आहे. सोनू सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी सतत संवाद साधत असतो. चाहते त्याला अनेक प्रश्न विचारताना दिसता. तसेच सोनू देखील त्यांना अनोख्या पद्धतीने उत्तरे देताना देतो. नुकताच एका चाहत्याने सोनू सूदची तुलना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे. तसेच या चाहत्याला सोनू सूदने भन्नाट उत्तरही दिले आहे.

एका चाहत्याने ट्विट करत ‘देशातील परिस्थिती ठीक झाल्यानंतर तुम्हाला दर रविवारी चित्रीकरणामधून सुट्टी घ्यावी लागेल. लोकं तुम्हाला भेटायला येतील. जे लोकं फिरायला येतील ते विचारतील सोनू सूद यांचे घर कुठे आहे. सोनू सूद हे पुढचे अमिताभ बच्चन आहेत’ असे म्हटले होते. त्यावर सोनू सूदने देखील उत्तर दिले आहे.

‘मित्रा, ते का येतील माझ्या घरी? मी त्या सगळ्यांच्या घरी जाईन. बटाट्याचे पराठे, पान आणि चहा घेईन’ असे त्याने म्हटले आहे.

तर दुसऱ्या एका यूजरने ‘सोनू सूद चित्रपटसृष्टीचा पुढचे रजनीकांत होणार का?’ असे म्हटले होते. त्यावर सोनू सूदने मला नेहमी सामान्य माणूस म्हणून आयुष्य जगायला आवडेल असे म्हटले आहे.

सोनू सूद लवकरच ‘द कपिल शर्मा’शोच्या पहिल्या भागामध्ये दिसणार आहे. या भागामध्ये सोनू सूदने गरजुंना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी कशी मदत केली. या कार्यात कोणते अडथळे आले यावर भाष्य करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:12 pm

Web Title: when sonu sood compared with amitabh bachchan actor reply wins your heart avb 95
Next Stories
1 डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बिग बींची खास पोस्ट; म्हणाले…
2 अभिज्ञा भावे पुन्हा प्रेमात; ‘त्या’ खास व्यक्तीसोबत शेअर केला फोटो
3 “माझ्या गावासाठी हा ऐतिहासिक क्षण”; Rafale आगमनानंतर अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना
Just Now!
X