सुपर हीरो आणि छोट्या पडद्यावरील सर्वांत आवडती विनोदी मालिका एकत्र आले तर काय होणार? हे समीकरण जरी अनोखं असलं तरी ते पाहणं तितकंच रंजक आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि आगामी सुपरहिरोपट ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ या दोघांचा हा ‘मॅश- अप’ व्हिडिओ असून नेटकऱ्यांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांनाच वेड लावलं आहे. एकीकडे ३०पेक्षा जास्त सुपरहिरोंची फौज असलेला हा चित्रपट आणि दुसरीकडे सासू-सुनांची भांडणं, त्यांच्यातील कट कारस्थानं अशीही कोणतीही भानगड न दाखवता निखळ मनोरंजनाचा आनंद देणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका. या दोन्ही गोष्टींना एकत्र आणत हा अफलातून व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये मालिकेतील विविध दृश्यं आणि त्याला अॅव्हेंजर्सच्या संवादाची जोड पाहायला मिळत आहे.

Bucket List : माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

या व्हिडिओला ‘Infinity war ft TMKOC’ असं शीर्षक देण्यात आलं असून २४ तासांच्या आता त्याला १ लाख ६० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. फेसबुकवर हा व्हिडिओ सध्या गाजत असून तुम्हालाही हे अनोखं व्हर्जन नक्कीच आवडेल.