News Flash

२८० रुपयांवरून ट्विंकल खन्ना दुकानदारावर भडकली

दुकानदाराला सुनावले खडेबोल

ट्विंकल खन्ना

अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या चित्रपटांमध्ये जरी झळकत नसली तरी नेहमीच ती कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. तिच्या परखड मतांमुळे आणि वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा होते. याच वक्तव्यांमुळे तिचे स्टारडम अजूनही कायम आहे. ट्विंकल रिअल लाइफमध्ये तापट स्वभावाची आहे. याच स्वभावामुळे तिने एका खेळण्याच्या दुकानदाराला २८० रुपयांवरून सुनावलं होतं.

२००७ मधला हा किस्सा आहे. ट्विंकल मुंबईतील जुहू इथल्या एका खेळण्यांच्या दुकानाजवळ उभी होती. याच वेळी दुकानात एक चार वर्षांचा मुलगा आला आणि दुकानातील खेळण्यांविषयी तो दुकानदाराला विचारू लागला. त्या दुकानदारानेही कौतुकाने मुलाला कोणतं खेळणं आवडलं असा प्रश्न विचारला. त्या मुलाने एका खेळण्याकडे बोट दाखवलं. तेव्हा दुकानदाराने मुलाकडून पैसे न घेता ते खेळणं त्याला भेट म्हणून दिलं.

वाचा : कमाल आर खान ट्विटरविरोधात कोर्टात जाणार 

दुकानाजवळ उभी असलेली ट्विंकल हे सर्व पाहत होती. तो मुलगा खेळणी घेऊन निघून गेल्यानंतर ट्विंकल त्या दुकानात गेली. ‘तू ज्या मुलाला ते खेळणं दिलं त्याची किंमत काय होती,’ असा प्रश्न तिने दुकानदाराला विचारला. त्याने २८० रुपये असं उत्तर देताच ट्विंकलचा पारा चढला. ‘२८० रुपये कमावण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला माहित आहे का?,’ अशा शब्दांत तिने दुकानदाराला सुनावलं. हे ऐकून तो दुकानदार निरुत्तर झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 4:13 pm

Web Title: when twinkle khanna got angry on toy shopkeeper for 280 rupees
Next Stories
1 Aamir Khan’s Diwali bash PHOTOS : आमिर खानची ग्रॅण्ड दिवाळी पार्टी
2 कमाल आर खान ट्विटरविरोधात कोर्टात जाणार
3 गेल्या २४ वर्षांत दिवाळीत कधीही फ्लॉप झाला नाही शाहरुख खान
Just Now!
X