News Flash

VIDEO: अमेरिकन दूतावास बॉलिवूडच्या प्रेमात

'युएस इंडिया दोस्ती' या नावाने हॅशटॅग देऊन शेअर केले

बॉलिवूड सिनेमांचा इतिहास चाळून पाहिला तर असे अनेक अजरामर संवाद आहेत जे तेव्हाही हिट होते आणि ते आजही हिट आहेत. या संवादांचे चाहते फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही बॉलिवूडकरांचे लाखो चाहते आहेत. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर आम्ही आज तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्हालाही आमचं म्हणणं पटेल. अमेरिकन दुतावासातही बॉलिवूडची क्रेझ पाहायला मिळत आहे. अमेरिकन दुतावासातील काही कर्मचाऱ्यांनी बॉलिवूडमधील काही हिट सिनेमांचे संवाद जसेच्या तसे बोलून दाखवले. कोणत्याही अमेरिकन व्यक्तिंनी अशा अस्खलित हिंदीमध्ये बॉलिवूडचे संवाद म्हटले नसतील.

नवी दिल्ली येथील अमेरिकन दुतावास बॉलिवूडमय झाले होते. या दुतावासाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकन कर्मचारी बॉलिवूडमधील अजरामर संवाद म्हणताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ‘नमक हलाल’ सिनेमातील ‘आय कॅन वॉक इंग्लिश’, ‘शोले’मधील, ‘कितने आदमी थे’, ‘शहेनशहा’मधील ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं’, ‘ओम शांती ओम’मधील एक चुटकी सिंदूर की किंमत’ यासारखे अनेक संवाद अभिनयासह म्हणून दाखवले आहेत.

Next Stories
1 ‘टायगर जिंदा है’मध्ये दिसणार कधीही न पाहिलेली रोमांचक साहसदृश्ये
2 VIDEO: …म्हणून वरुण धवनने आलियाला ‘किस’ करण्यास दिला नकार
3 ‘साहो’च्या सेटवर नवा नियम
Just Now!
X