28 September 2020

News Flash

विकी स्वत:लाच का म्हणतोय, ‘हसबंड मटेरिअल’

नेमकं काय आहे प्रकरण

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विकी कौशल. उत्तम अभिनय शैली आणि दर्जेदार कथानकाची निवड यामुळे विकीचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. केवळ देशातच नाही तर विदेशातही त्याचे अनेक चाहते आहेत. विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची सर्वाधिक क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर विकीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून तरुणींमध्ये त्याची लोकप्रियता किती आहे हे दिसून येतं. इतकंच नाही तर या व्हिडीओत त्याने स्वत:ला  हसबंड मटेरिअल म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियावर विकीचा टोरंटोमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. विकी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी काही काळापूर्वी टोरंटो इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी विकीला पाहून एका चाहतीने मोठ्या आवाजात त्याला आय लव्ह यू म्हटलं होतंं. यावेळी बोलत असताना त्याने मी हसबंड मटेरिअल असल्याचं  म्हटलं होतं.

 

या फेस्टिव्हलमध्ये विकीला पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे विकी स्टेजवर गेल्यानंतर एका चाहतीने मोठ्या आवाजात आय लव्ह यू असं म्हटलं. या चाहतीचा आवाज ऐकल्यानंतर अभिषेकने मजेमध्ये विकी अजून लहान आहे असं म्हटलं. मात्र अभिषेकचं हे वाक्य ऐकल्यानंतर विकीनेही मस्करीमध्ये स्वत:ला हसबंड मटेरिअल असल्याचं सांगितलं विकीचं हे उत्तर ऐकून उपस्थित साऱ्यांमध्ये एक हशा पिकला.

दरम्यान, विकी ‘मसान’, ‘संजू’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटांमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. विकी केवळ प्रकाशझोतातच आला नाही तर त्याने लोकप्रियतेचं शिखरही गाठलं. अलिकडेच त्याचा ‘भूत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असून तो बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 4:45 pm

Web Title: when vicky kaushal call himself husband material cute reaction ssj 93
Next Stories
1 रामायणानंतर ‘उत्तर रामायणा’चा विक्रम
2 “भविष्यात फोनवरुनच दिग्दर्शन केलं जाईल”; दंगल फेम दिग्दर्शकाचा दावा
3 ‘त्या’ फाईटमुळे आजही शरीर काळं-निळं पडतं; महाभारत मालिकेतील दुर्योधनाने सांगितला अनुभव
Just Now!
X