X

कंगना आणि हृतिकच्या वादाला ट्विटरकडून जोक आणि मीम्सची फोडणी

'इत्तेफाक'चा पोस्टर तरी यातून कसा सुटेल

हृतिक रोशन आणि कंगना रणौतच्या वादाने आता एक नवे वळण घेतले आहे. ‘आप की अदालत’मध्ये कंगनाने हृतिकवर अनेक गंभीर आरोप केले होते. या मुलाखतीनंतरही हृतिकने या प्रकरणात काही बोलणे टाळले होते. पण काल त्याने आपले मत मांडणारे भले मोठे पत्र लिहून सोशल मीडियावर शेअर केले. या पत्रात तो कंगनाला खासगीत कधीही भेटला नसल्याचे म्हटले. याउलट तिच्यावर आरोप करताना त्याने म्हटले की, कंगनाने त्याच्यासोबत नात्यात असल्याचे पुरावे सर्वांना दाखवावे.

कंगना आणि हृतिकच्या या वादात ट्विटरकर मात्र चांगली मजा घेत आहेत. अनेकांनी हे प्रकरण थांबवण्याचीही मागणी केली तर काहींनी कंगना आणि हृतिकचे मीम्स करण्यास सुरूवात केली.

‘इत्तेफाक’चा पोस्टर तरी यातून कसा सुटेल. सध्या व्हॉट्सअॅपवर इत्तेफाकचा फेरफार केलेला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत सिद्धार्थ मल्होत्राच्या चेहऱ्यावर हृतिकचा चेहरा लावण्यात आला आहे. तर सोनाक्षीच्या चेहऱ्यावर कंगनाचा फोटो लावण्यात आला आहे. आता या प्रकरणात प्रेक्षकांना अजून काय काय पाहावे लागणार हे तूर्त तरी कोणीच सांगू शकत नाही.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain