01 December 2020

News Flash

रामायण, महाभारत घडलं तेव्हा केवळ हिंदूच होते का?; अभिनेत्याच्या प्रश्नावर कंगनानं दिलं उत्तर

कंगना रणौतने सांगितलं हिंदू धर्म म्हणजे काय?

अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. मात्र यावेळी तो चक्क भारतीय पौराणिक कथांमुळे चर्चेत आहे. महाभारत, रामायणाच्या काळात आपल्या देशात केवळ हिंदूच होते का? असा सवाल त्याने केला. त्याच्या या प्रश्नावर त्याला कंगना रणौतने उत्तर दिलं आहे. तिचं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“शास्त्र, खगोलशास्त्रीय गणना आणि नक्षत्रांच्या स्थानानुसार रामायण ७००० वर्षांपूर्वी व महाभारत ५००० हजार वर्षांपूर्वी घडलं होतं. याचा अर्थ त्याकाळात केवळ हिंदूच होते का?” असा प्रश्न कमाल खानने विचारला होता. त्याच्या या प्रश्नावर कंगना उत्तर दिलं.

“हिंदू हा धर्म नव्हता तर ती एक ओळख होती. ज्या व्यक्तीचा जन्म हिंद महासागर आणि हिमालय यांच्या दरम्यान व्हायचा त्याला हिंदू म्हणायचे. त्या काळात धर्म ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. योग आदिकाळापासून आहे. त्यानंतर हिंदू आयकॉन राम आणि कृष्ण आले.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने केआरकेच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. दोघांचेही ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 5:44 pm

Web Title: who is a hindu kamaal r khan kangana ranaut mppg 94
Next Stories
1 नोरा फतेहीने कपिल शर्मा शोमध्ये केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
2 दिशाने धनुष्यबाण दाखवत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा; फोटो होतोय व्हायरल…
3 “माफी माग अन्यथा मानहानिचा दावा ठोकेन”; लविनाच्या आरोपांना अमायराचं प्रत्युत्तर
Just Now!
X