News Flash

जाणून घ्या, कपिल शर्माची होणारी बायको गिन्नी छत्राथविषयी…..

.. अशी सुरु झाली कपिल-गिन्नीची 'लव्हस्टोरी'

कपिल शर्मा लवकरच गिन्नी छत्राथ हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

आपल्या विनोदाने टेलिव्हिजन विश्व गाजवणारा विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा बऱ्याच काळापासून त्याच्या लव्ह लाइफबद्दल गुप्तता बाळगून होता. अखेर कपिलने शनिवारी सकाळी त्याच्या मनावर राज्य करणाऱ्या तरुणीचा खुलासा केला आहे. गिन्नी छत्राथ हिच्याशी तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचा साखरपुडाही झाल्याचे म्हटले जातेय.
कपिल शर्माने शनिवारी सकाळी गिन्नीच्या फोटोसह एक खास ट्विट केले. सुरुवातीच्या पहिल्या ट्विटमध्ये, मी पुढच्या ३० मिनिटात तुमच्यासोबत एक खास गोष्ट शेअर करणार असल्याचे,  त्याने म्हटले. त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये कपिलने त्याच्या प्रेयसीसोबतचा फोटो ट्विट करत लिहले की, ही माझी अर्धांगिनी आहे असे मी म्हणणार नाही. ती मला पूर्णत्व आणते. लव्ह यू गिन्नी…. कृपया हिचे स्वागत करा.. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. कपिलच्या या ट्विटनंतर ही गिन्नी आहे तरी कोण? असा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला असेल. तर, कॉलेजच्या दिवसांपासून कपिल आणि गिन्नी एकमेकांना ओळखतात. मैत्रीपासून सुरुवात झालेल्या या नात्याचे प्रेमात रुपांतरण होण्यास काही वेळ लागला, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. आयुष्याच्या चढ-उतारामध्ये या दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. गिन्नी चतार्थ आणि कपिल शर्मा यांच्याबद्दलच्या काही दुर्मिळ गोष्टी:

१. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली. या दोघांनीही स्टॅण्ड अप कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली होती. महाविद्यालयात असताना कपिल स्वतः गिन्नीसाठी काही शोचे काम मिळवून द्यायचा. जवळपास १० वर्षांपासून हे प्रेमीयुगुल एकत्र आहे.

२. तुला आयुष्याची जोडीदार म्हणून जशी मुलगी हवी आहे अगदी तशीच गिन्नी असल्याचे, कपिलचे मित्र त्याला सतत सांगायचे. कपिलची सहकलाकार असलेली सुमोना चक्रवर्ती आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रिती सिमोज यांच्यासोबत त्याचे नाव जोडले गेले होते. मात्र, याचा कपिल-गिन्नीच्या नात्यावर जराही परिणाम न झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

३. कपिलच्या या नात्याने त्याची आई खूप खूश आहे. त्याने आता आपल्या आयुष्यात स्थिरस्थावर व्हावे, संसार सुरु करावा आणि आपल्या अवतीभोवती नातवंडं खेळावी, अशी त्याच्या आईची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती, असे सुत्रांनी सांगितले.

४. सध्या जलंधर येथे राहत असलेली गिन्नी लग्नानंतर ‘के९’ या कपिलच्या निर्मिती संस्थेची धुरा सांभाळणार आहे.

kapil-sharma-ginni

गिन्नी आणि कपिल ‘हस बलिये’ कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या कार्यक्रमात विजेतेपद त्यांना मिळाले नाही. मात्र, त्यांच्या कामाची तेव्हा बरीच प्रशंसा झाली होती. लाइमलाइटपासून दूर राहणारी गिन्नी तिच्या वडिलांना कामात मदत करते. तिने एमबीए केले असून तिला एक लहान बहिण आहे. दरम्यान, काही पंजाबी शो आणि चित्रपटांच्या ऑफर्सही गिन्नीने नाकारल्याचे कळते.

गिन्नी चतार्थ हिचे इन्स्टाग्रामवरील काही फोटो:

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 2:55 pm

Web Title: who is ginni kapil sharma to marry ginni chatrath see her pics
Next Stories
1 कपिलने फेसबुकवर शेअर केला होणाऱ्या बायकोचा फोटो
2 अनुष्का स्वतःला समजायची कचरा वेचणारी मुलगी
3 शाहिद, सोनाक्षीचा ड्रायव्हर आता विकतोय मोमोज्!
Just Now!
X