News Flash

Bigg Boss 12 : जाणून घ्या, ‘भजन सम्राट’ अनुप जलोटा यांच्या गर्लफ्रेंडबद्दल

२८ वर्षीय जसलीन अनुप जलोटा यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही जसलीन मथारू आहे तरी कोण?

अनुप जलोटा, जसलीन मथारू

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस’च्या बाराव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. जोडीदार या थीमसह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या शोमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे ‘भजन सम्राट’ अनूप जलोटा यांची. ही चर्चा होण्यामागचं कारणसुद्धा तितकंच खास आहे. पहिलं कारण म्हणजे आपल्या शांत- गंभीर स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या अनुप जलोटा यांचा वादग्रस्त ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश. चर्चेचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची शिष्या आणि गर्लफ्रेंड जसलीन मथारू. २८ वर्षीय जसलीन अनुप जलोटा यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही जसलीन मथारू आहे तरी कोण?

जसलीन २८ वर्षांची असून ती मूळची कोलकाताची आहे. गायनात तिला रुची असून वयाच्या ११व्या वर्षापासून तिने गायनाचे प्रशिक्षण घेतले. क्लासिकल आणि वेस्टर्न या दोन्ही प्रकारच्या गायनात ती निपुण असल्याचं म्हटलं जातं. तिने आजवर बऱ्याच प्रसिद्ध गायकांसोबत परफॉर्म केले आहे. मिका सिंग, सुखविंदर सिंग, पपॉन यांसारख्या नावाजलेल्या गायकांसोबत तिने परफॉर्म केले आहे.

गायनासोबतच तिला नृत्याचीही फार आवड आहे. भरतनाट्यम, हिप-हॉप, साल्सा आणि बेले डान्स या नृत्याच्या प्रकारांचे तिने प्रशिक्षण घेतले आहे. जसलीनचं सौंदर्य आणि तिचं नृत्यकौशल्य मला सर्वाधिक आकर्षित करत असल्याचं जलोटा यांनी ‘बिग बॉस’च्या ग्रँड प्रिमिअरमध्ये सांगितलं होतं.

जसलीनचे वडील चित्रपट निर्माते असून त्यांच्या ‘लव डे’ या चित्रपटात जसलीनने गाणंदेखील गायलं आहे. इतकंच नाही तर किक बॉक्सिंगमध्ये तिने ब्राऊन बेल्ट मिळवला आहे.

‘बिग बॉस १२’च्या ग्रँड प्रिमिअरमध्ये जसलीन आणि अनुप जलोटा यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. गेल्या साडेतीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. ‘मला भेटण्यासाठी अनुप कोलकाताला यायचे आणि आम्ही लपूनछपून एकमेकांना भेटायचो. पण आता बिग बॉसच्या घरात आम्हाला एकत्र मुक्तपणे वावरता येणार आहे,’ असं जसलीन म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2018 3:14 pm

Web Title: who is jasleen matharu unknown facts anup jalota girlfriend bigg boss 12
Next Stories
1 गांजा,कोकेनवरुन मुंबई पोलिसांनी उडविली उदय चोप्राची खिल्ली, म्हणाले…
2 Bigg Boss 12 : ३७ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडमुळे अनुप जलोटा ट्रोल; प्रियांका-निकशी केली तुलना
3 पुन्हा एकदा एकत्र झळकणार प्रार्थना- अनिकेतची जोडी
Just Now!
X