News Flash

‘हे’ आहेत सचिन पिळगावकरांचे आवडते मुख्यमंत्री

'फेसबुक लाइव्ह'द्वारे दिली चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे

सचिन पिळगावकर

सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील दरी कमी झाली आहे. सोशल मीडियाद्वारे सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांच्या आणखी जवळ आले आहेत आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारू लागले आहेत. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकताच ‘फक्त मराठी फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चाहत्यांच्या विविध प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली. एका चाहत्याने त्यांना त्यांचा आवडता मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी यशवंतराव चव्हाण असं उत्तर दिलं.

“माझ्याकडे त्यांचा एक फोटोसुद्धा आहे आणि तो फोटो मी फेसबुक पेजवर शेअरसुद्धा नक्की करेन. महाराष्ट्र जेव्हा बनला, तेव्हा पहिले मुख्यमंत्री जे झाले ती माझी सर्वांत आवडती व्यक्ती आहे. ती व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण. मी लहान असताना माझा त्यांच्यासोबत एक फोटो आहे. ते माझे आदर्श आहेत. त्यांनी माझे भरपूर लाड केले आहेत. मला राजकारणाविषयी फारशी माहिती नाही. पण आवडते मुख्यमंत्री म्हटलं की त्यांचाच चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येतो”, असं ते म्हणाले.

आणखी वाचा : ‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक बनवणार का?; सचिन पिळगावकर म्हणतात..

यावेळी सचिन पिळगावकर यांनी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सिझन लवकरच हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं. त्याचसोबत सुप्रिया पिळगावकरांसोबत एकत्र पुन्हा काम कधी करणार या प्रश्नाचंही त्यांनी मजेशीर उत्तर दिलं. “केवळ मी रोल ऑफर केला म्हणून ती लगेच स्वीकारत नाही. तर कथा कशी आहे, भूमिका कशी आहे या सगळ्यांचा ती विचार करूनच होकार देते अथवा दुसऱ्या कलाकाराला विचारण्यास सांगते. त्यामुळे जोपर्यंत तिचा होकार मिळत नाही तोपर्यंत मी तिच्यासोबत काम करू शकत नाही”, असं त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 1:03 pm

Web Title: who is the favorite chief minister of sachin pilgaonkar ssv 92
Next Stories
1 ‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक बनवणार का?; सचिन पिळगावकर म्हणतात..
2 सिद्धार्थ शुक्लानं पटकावलं ‘बिग बॉस १३’चं जेतेपद
3 साथ प्रेमाची
Just Now!
X