कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठी हा बहुचर्चित रिअॅलिटी शो सुरू झाला आणि हळूहळू तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागला. बिग बॉस घरात पहिल्याच आठवड्यात विनीत भोंडे हा कॅप्टन ठरला. पण आता एक आठवड्याचा कालावधी संपला असून दुसरा कॅप्टन निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बिग बॉस सर्व सदस्यांना एकत्र बोलावून नवीन कॅप्टन निवडण्याची प्रक्रिया सांगणार आहे. या आठवड्यात झालेल्या प्रार्थना यज्ञ आणि इतर टास्कमध्ये ज्यांनी उत्तम प्रकारे कामगिरी केली त्यांना कॅप्टन होण्याची संधी आहे.

बिग बॉसच्या घरातील सदस्य आता कोणाला कॅप्टन होण्याची संधी देतील? कॅप्टन निवडण्याची ही प्रक्रिया कशी असेल? कोणता स्पर्धक कोणाला संधी देईल?, हे पाहणं फारच औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : मी शाहरुखचा ‘स्वदेस’ पाहिलाच नाही- आमिर खान

विनीत भोंडे सध्या बिग बॉसच्या घरात चर्चेचा विषय झाला असून, घरातील बऱ्याच सदस्यांना त्याचं वागणं पटत नाही आहे. उषा नाडकर्णी यांनीही विनीतला आपल्या बोलण्यावर आणि आवाजावर संयम ठेवण्याची वारंवार ताकीद दिली. त्यातच विनीतला बिग बॉस कन्फेशन रूममध्ये बोलवण्यात येणार आहे. ज्यामध्ये बिग बॉस त्याला एक सिक्रेट टास्क देणार आहेत. या टास्कनुसार घरातील कोणतेही चार स्पर्धक त्याच्या बाजूने करायचे आहेत, जे विनीत चांगला कॅप्टन आहे असं म्हणतील. हा टास्क आता विनीत कसा पूर्ण करणार, त्या चार स्पर्धकांची मनं वळवण्यात तो यशस्वी ठरणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.