18 September 2020

News Flash

लेखक दिग्दर्शकाच्या वादात अडकला जेम्स बॉण्ड

जेम्स बॉण्ड ही इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक आहे

पाच दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा ‘जेम्स बॉण्ड’ ही इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक आहे. बॉण्ड चित्रपट मालिकेतील २५वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, परंतु सध्या बॉण्ड म्हणून कार्यरत असलेल्या अभिनेता डॅनियल क्रेगबाबत निर्माते संभ्रमात असल्यामुळे मुख्य व्यक्तिरेखा कोण साकारणार याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. २००६ साली ‘कॅसिनो रॉयल’ या चित्रपटातून त्याने बॉण्डच्या विश्वात पदार्पण केले. तेव्हा पाच दशकांहून जास्त काळ यशस्वी ठरलेली व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता त्याच्यात आहे का? याबाबत खात्री नसलेल्या चाहत्यांनी व समीक्षकांनी त्याच्यावर प्रचंड टीका केली, परंतु दिग्दर्शक मार्टिन कॅम्पबेल आपल्या निवडीवर ठाम होते. त्यांनी क्रेगला संधी दिली आणि त्याने मिळालेल्या संधीचे सोने करत उत्तम अभिनय प्रदर्शन केले. जुन्या आकडेवारीची नोंद घेता लक्षात येते की इतर बॉण्डपटांच्या तुलनेने डॅनियलने केलेले ‘कॅसिनो रॉयल’, ‘क्वाँटम ऑफ सोलेस’, ‘स्कायफॉल’, ‘स्पेक्टर’ हे चित्रपट जास्त यशस्वी ठरलेले आहेत. या पाश्र्वभूमीवर  जेम्स बॉण्डचा वारसा पुढे नेण्यासाठी तो योग्य अभिनेता आहे हे त्याने सिद्ध केले आहे, परंतु लेखक रॉबर्ट वेड यांच्या मनात अजूनही शंका आहे. त्यांच्या मते डॅनियल एक उत्तम अभिनेता असून बॉण्ड व्यक्तिरेखा त्याने चांगल्या प्रकारे साकारली आहे, परंतु कथानकाचा विचार करता त्याचे वय आणि व्यक्तिरेखेचे वय यात तफावत आहे, म्हणून त्यांचा विरोध आहे. दिग्दर्शक मार्टिन कॅम्पबेलने मात्र यांनी त्याला हिरवा कंदील दिलेला आहे. त्यांच्या मते तो अनुभवी असून या भूमिकेसाठी तोच योग्य आहे. लेखक आणि दिग्दर्शकामधील हा वाद लवकरच मिटेल आणि पुढील जेम्स बॉण्डची घोषणा होईल, अशी चाहत्यांना आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2017 2:27 am

Web Title: who will be the next james bond hollywood katta part 29
टॅग Hollywood Katta
Next Stories
1 ‘अल्फा’ एक संघर्ष कथा
2 ‘टिळक आणि आगरकर’ : नव्या संदर्भात..
3 नाटय़चौकाराची पर्वणी!
Just Now!
X