News Flash

नेहा पेंडसेवर का होतोय शुभेच्छांचा वर्षाव?

अभिनेता अभिजीत खांडकेकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

अभिजीत खांडकेकरने दिल्या शुभेच्छा

अभिनेता अभिजीत खांडकेकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या फोटोपेक्षाही त्यावर दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेण्यास कारणीभूत ठरलंय. या फोटोमध्ये अभिजीत, नेहा पेंडसे, श्रुती मराठे, हेमांगी कवी या अभिनेत्रींसोबत पाहायला मिळत आहे. तर कॅप्शनमध्ये त्याने ‘काँग्रॅच्युलेशन्स’ (अभिनंदन) असं लिहिलं आहे.

दुसरीकडे नेहाने मात्र या सर्व चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं आहे. ना माझा साखरपुडा झाला, ना लग्न ठरलंय. ना मी बिग बॉसमध्ये जाण्याच्या विचारात आहे, असं तिने सांगितलंय. जर यापैकी काहीच नसेल तर अभिजीतने लिहिलेल्या कॅप्शनमागे आणि नेहाच्या या फोटोमागे नेमकं कारण आहे तरी काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

नेहा पेंडसेभोवती हे सर्व कलाकार उभे आहेत तर नेहाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं आहे. एका बाजूने श्रुती मराठेने तर दुसरीकडून हेमांगी कवीने मिठी मारली आहे. त्यामुळे नेहाचं लग्न ठरलंय की काय अशी चर्चा रंगली आहे. तर कोणी नेहा ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याचा अंदाज बांधत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 3:25 pm

Web Title: why abhijeet khandkekar congratulated actress neha pendse
Next Stories
1 ‘साथ दे तू मला’ मालिकेत नवा ट्विस्ट
2 डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
3 …म्हणून प्रभास झाला भावूक
Just Now!
X