21 October 2020

News Flash

‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

भारतातील फसव्या उद्योजकांवर आधारित माहितीपट

नवी दिल्ली : 'बॅड बॉय बिलेनिअर्स' या वेबसीरिजचा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात आला आहे.

भारतातील कुप्रसिद्ध शक्तिशाली भांडवलदारांच्या भ्रष्टाचारांचा आढावा घेणारा माहितीपट (वेबसीरिज) नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मने तयार केला असून येत्या २ सप्टेंबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी त्याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. मात्र, आता हा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन काढून टाकण्यात आला आहे. ही वेबसीरिजवर ज्या फसव्या उद्योजकांवर आधारित आहे त्या उद्योजकांनी याच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला असून दिल्ली हायकोर्टासह कनिष्ठ कोर्टांमध्ये धाव घेतली आहे.

बिहारमधील स्थानिक अरारिया कोर्टाने गेल्या आठवड्यात ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ या वेबसीरिजच्या प्रदर्शनावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कोर्टात सहारा उद्योगाचे सर्वोसर्वा सुब्रतो रॉय यांनी वेबसीरिजच्या स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती. तसेच पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याने देखील दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करुन वेबसीरिज प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवण्यात यावी अशी मागणी केली होती. दरम्यान, या बिहारच्या कोर्टाने आणलेल्या स्थिगितीविरोधात नेटफ्लिक्स पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. मात्र, नेटफ्लिक्सने या ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर आपल्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकला आहे. मात्र, युट्यूबर तो अद्यापही ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने काल मेहुल चोक्सीची याचिका फेटाळून लावली. चोक्सीला मोठा दिलासा देण्यास नकार देताना दोन तास चाललेल्या सुनावणीदरम्यान न्या. नवीन चावला म्हणाले, खासगी अधिकारांच्या प्लॅटफॉर्मबाबत दाखल करण्यात आलेली रिट याचिका कायम ठेवता येत नाही. कोर्टाने पुढे म्हटलं की, ही याचिका दिवाणी कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातील आहे. त्या ठिकाणी याचिका दाखल करण्याचं याचिकाकर्त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे.”

चोक्सी हा गितांजली जेम्सचा प्रमोटर असून त्याचा भाचा नीरव मोदी हा १४ हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. नीरव मोदीने गेल्या वर्षी भारतातून पलायन केले असून त्याच्याकडे ‘अँटिगुआ’ आणि ‘बार्बुडा’ या देशांचे नागरिकत्व आहे.

नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलेल्या या वेब सीरिजच्या पोस्टरमध्ये चोक्सीचा भाचा आणि पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी, सहारा ग्रुपचा सुब्रतो रॉय, एसबीआयला ९ हजार कोटींचा चुना लाऊन फरार झालेला किंगफिशर एअरलाइन्सचा चेअरमन विजय मल्ल्या आणि सत्यम घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी रामलिंगा राजू यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. त्यामुळे ही वेबसीरिज सध्या चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 2:23 pm

Web Title: why bad boy billionaires trailer is unavailable on netflix aau 85
Next Stories
1 …पण मोदींनी खेळण्यांवर केली ‘मन की बात’; राहुल गांधींचं टीकास्त्र
2 लोकल खेळण्यांसाठी आता व्होकल होण्याची वेळ आहे : मोदी
3 देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींचे नमन…
Just Now!
X