11 December 2017

News Flash

हृतिक-कंगनाच्या वादात रणबीरची एण्ट्री?

कंगना आणि रणबीरचं नाव जोडलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 2:53 PM

हृतिक रोशन, कंगना रणौत, रणबीर कपूर

हृतिक रोशन आणि कंगना रणौतच्या लव्हस्टोरीला, एकेकाळी त्यांच्यात असलेल्या रिलेशनशिपला आणखी एक नवं वळण मिळालं आहे. या नव्या वळणासोबतच एका व्यक्तीचीही या वादात एण्ट्री झाली आहे. बी-टाऊनमध्ये सध्या सर्वांसाठीच चर्चेचा विषय ठरणाऱ्या या वादात एण्ट्री झालेल्या त्या व्यक्तीचं नाव आहे रणबीर कपूर. बसला ना तुम्हालाही धक्का? कंगना-हृतिकमध्ये असणाऱ्या वादात रणबीरचं नाव का, हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घर करत आहे.

‘पिंकव्हिला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘रिपब्लिक टीव्ही’ने कंगनाविरोधात हृतिकने दाखल केलेलं जे तक्रारपत्र सर्वांसमोर आणलं होतं, त्यामध्ये रणबीर कपूरच्या नावाचाही उल्लेख होता. कंगना रणबीर आणि आमिर खानचं नाव घेऊन आपल्या मनात त्यांच्याविषयी इर्ष्येची भावना निर्माण करु पाहात होती, असा आरोप हृतिकने कंगनावर लावला होता. त्यामुळे आता ही बाब खरी की, खोटी याची उकल होण्याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : कंगनाने मला अश्लील मेसेज पाठवले होते – हृतिक रोशन

कंगना आणि रणबीरचं नाव जोडलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच कंगना आणि कतरिनामध्ये रणबीरच्या मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडल्याचंही म्हटलं जात होतं. त्याशिवाय एका प्रसिद्ध वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये कंगनाने रणबीरला तिचे काही फोटो पाठवल्यामुळे कतरिनाने तिच्यावर आगपाखड केल्याची चर्चा होती. त्यावेळी कतरिना आणि रणबीर रिलेशनशिपमध्ये होते.

२०१६ मध्ये रणबीर आणि कंगना रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. कंगनासोबत नाव जोडलं जात असल्याचं लक्षात येताच रणबीरने त्याची नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एकंदर या दोघांमध्ये असणारे नात्याचे धागे-दोरे पाहता पुन्हा एकदा रणबीरचं नाव हृतिक आणि कंगनाच्या वादात पुढे केलं जात आहे. तेव्हा आता कोणीतरी पुढे येऊन हा सर्व गोंधळ थांबवावा अशीच प्रतिक्रिया त्यांचे चाहते देत आहेत.

First Published on October 4, 2017 2:50 pm

Web Title: why bollywood actor ranbir kapoor is dragged in hrithik roshan kangana ranauts fight