नुकताच 'केसरी' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाकेने लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. "सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?" असा प्रश्न सुजयने विचारला आहे. सुजय डहाकेचा ‘केसरी’ हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कुस्ती म्हणजे नुसतीच मस्तवाल शरीराची मस्ती नाही, तो बुध्दीचातुर्याने आणि मनापासून खेळला जाणारा खेळ आहे, हे दाखवण्यात आले आहे.