23 October 2020

News Flash

‘हेलिकॉप्टर इला’ म्हणजे काय रे भाऊ?

चित्रपटाचं नाव असंच का ठेवलं यांसारखे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनातही घिरट्या घालून लागले, तेव्हा काजोलनंच सांगितला या नावामागचा अर्थ

'हेलिकॉप्टर इला'

अभिनेत्री काजोल हिचा ‘हेलिकॉप्टर इला’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. आजच्या पीढीतील आई आणि मुलांचं नातं या चित्रपटातून उलगडणार आहे. खरं तर चित्रपटाचं नाव ऐकून अनेकांना त्याबद्दल कुतूहल वाटलं. ‘हेलिकॉप्टर इला’ म्हणजे नेमकं काय आणि चित्रपटाचं नाव असंच का ठेवलं यांसारखे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनातही घिरट्या घालून लागले.

तेव्हा चित्रपटाचं नाव ‘हेलिकॉप्टर इला’ का ठेवलं या मागचं कारण काजोलनं उलगडलं आहे. ‘हेलिकॉप्टर इला’ हे नाव ‘हेलिकॉप्टर मॉम’ या हॅशटॅगवरून सुचलं. त्यावेळी ‘हेलिकॉप्टर मॉम’ हा हॅशटॅग चर्चेत आला होता. जी आई आपल्या मुलांची खूप काळजी घेते, जिचं मन नेहमीच आपल्या मुलांभोवती घिरट्या घालतं. जिचं आयुष्यचं आपल्या मुलांभोवती फिरत अशा आईसाठी ‘हेलिकॉप्टर मॉम’ हा शब्द आजकाल सोशल मीडियावर वापरला जातो. तेव्हा तिथूनच मला ही कल्पना सुचली. या चित्रपटात मी इला या महिलेची भूमिका साकारत आहे. इला ही एका मुलाची आई आहे. तिचं आयुष्य आपल्या मुलाभोवतीच फिरत म्हणूनच आम्ही चित्रपटाचं नाव ‘हेलिकॉप्टर इला’ असं ठेवल्याचं कालोजलनं ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 4:55 pm

Web Title: why is the film called helicopter eela kajol explain
Next Stories
1 ‘कन्यापूजेऐवजी मुलींना सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्याचे समाधान वेगळेच’
2 मद्याच्या अधीन गेल्यानंतर आलोक नाथांचं वेगळं रुप समोर येतं – रेणुका शहाणे
3 #MeToo : आलोक नाथ स्त्रीलंपट, आणखी एका अभिनेत्रीचा आरोप
Just Now!
X