X

… या अभिनेत्रीशीही करण सिंग ग्रोवरने केला होता साखरपुडा

करण बिपाशा बासूसोबत त्याचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे

अभिनेता करण सिंग ग्रोवरचे नाव घेतले की सर्वात आधी डोळ्यांसमोर येते ते म्हणजे त्याची तीन लग्न. त्यातही बिपाशा बासूसोबत लग्न केल्यानंतर तो अधिक चर्चेत आला. त्याच्या लग्नावरुन अनेकदा सोशल मीडियावर जोक्सही व्हायरल झाले होते. पण त्याच्या या तीन लग्नांच्याच एवढ्या चर्चा झाल्या की त्याच्या इतर अफेअर्सकडे लक्षच दिले गेले नाही.

करण हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा. श्रद्धा निगमसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे नाव कोरिओग्राफर निकोल अल्वरसोबत जोडले गेले. पण त्यांचे रिलेशन फार काळ टिकले नाही. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री बरखा बिश्तसोबतही तो नात्यामध्ये होता. हे दोघं दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी साखरपुडाही केला होता आणि लवकरच लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता.

बरखा आणि त्याने २००४ मध्ये एम टीव्हीच्या ‘कितनी मस्त है जिंदगी’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेमध्येच त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अनेक कार्यक्रमात आणि पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसले होते. पण साधारण २००६ मध्ये दोघांच्या नात्यात जेनिफरमुळे दुरावा आला आणि त्याने बरखासोबतचा साखरपुडा मोडला.

करण सिंग ग्रोवर, जेनिफर विंगेट

करण आणि श्रद्धाने अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. लग्नानंतर श्रद्धाला करणचे निकोलसोबतच्या अफेअरबद्दल कळले आणि तिने अवघ्या १० महिन्यांमध्ये घटस्फोटाची मागणी केली. निकोलनंतर त्याच्या आयुष्यात बरखा आली, बरखासोबत त्याने साखरपुडाही केला. पण या नात्यात स्थिर होत असताना पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात जेनिफर विंगेट आली. जेनिफरसोबत त्याने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत असताना अचानक जेनिफर आणि करणच्या घटस्फोटांची बातमी समोर आली. जेनिफरसोबतचे नाते तुटण्यात बिपाशा बासू जबाबदार असल्याचे समोर आले.

आता करण बिपाशा बासूसोबत त्याचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. करणने आतापर्यंत पंजाबी, खिश्चन आणि हिंदू अशा तीन पद्धतीने लग्न केली. त्याच्या या तीन लग्नामुळे त्याची बरखासोबतची प्रेमकहाणी झाकोळली गेली. करणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्षांनी बरखाने अभिनेता इंद्रनेल सेनगुप्तासोबत लग्न केले. त्यांना एक छोटी मुलगीही आहे.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain