23 September 2020

News Flash

…या कारणामुळे कतरिनाने अद्याप पाहिला नाही ‘ए दिल है मुश्किल’चा ट्रेलर

फॅन्स पुन्हा एकदा रणबीरचा जबरदस्त रोमॅन्टिक अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

कतरिना कैफ

सर्वसाधारणपणे कौटुंबिक चित्रपट साकारणारा चित्रपटकर्ता करण जोहर ‘ए दिल हैं मुश्किल’ हा प्रेमाचा त्रिकोण असलेला बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा चित्रपटात त्याच्याबरोबर रोमान्स करताना दिसतील. फवाद खानचादेखील चित्रपटात अभिनय असल्याचे चित्रपटाचा ट्रेलर पाहून लक्षात येते. ‘ए दिल है मुश्किल’चा ट्रेलर चित्रपटरसिकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून, चित्रपटातील गाणीदेखील अनेकांना आवडल्याचे पाहायला मिळत आहे. फॅन्स रणबीरला पुन्हा एकदा जबरस्त रोमॅन्टिक भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहेत. असे असताना एका व्यक्तीने मात्र हा चित्रपट पूर्णपणे बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. ती व्यक्ती म्हणजे रणबीरची पूर्वश्रमीची कथित प्रेयसी कतरिना कैफ.

जिथे रणबीरच्या चाहत्यांसाठी त्याच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपटातील गाणी गॉसिप इशू झाला आहे, तिथे कतरिनाने चित्रपटाचा टिझरदेखील अद्याप पाहिलेला नाही. ‘ए दिल हैं मुश्किल’ चित्रपटाच्या ट्रेलरचा आनंद आतापर्यंत लाखो लोकांनी घेतला असला तरी कतरिनाने मात्र अद्याप हा ट्रेलर पाहिला नसल्याचे इंग्रजी संकेतस्थळ ‘डीएनए’च्या वृत्तात म्हटले आहे. कतरिनाला हा चित्रपट आणि रणबीरशी काहीही देणे-घेणे नसल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजते. रणबीरशीनिगडीत प्रत्येक गोष्ट तिला विसरायची आहे. चित्रपट पाहिल्याने अणि त्यातील गाणी ऐकल्याने जुन्या आठवणी जागृत होऊन त्रास होण्याची भीती तिला वाटते. आयुष्यात आता पुढे सरकून नवीन चित्रपटांद्वारे तिला आपल्या कारकिर्दीची सुरुवात करायची आहे. असेदेखील सूत्रांचा हवाला देत या वृत्तात म्हटले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात रणबीर आणि कतरिनाने आपल्या वाटा वेगळ्या करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते. असे असले तरी रणबीरकडून अद्याप दरवाजे उघडे असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 6:12 pm

Web Title: why katrina kaif refused to watch ae dil hai mushkil trailer songs and teaser
Next Stories
1 पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडसाठी किती महत्त्वाचे ?
2 तरुण असतो तर कदाचित देश सोडण्याचा विचार केला असता – इरफान खान
3 मराठी मालिकेत प्रथमच ‘अंडरवॉटर’ चित्रीकरण
Just Now!
X