09 December 2019

News Flash

शिल्पा शिंदे अचानक आली टॉप ट्रेंडमध्ये; कारण वाचाल तर तुम्हीही व्हाल हैराण

जाणून घ्या शिल्पा शिंदे का होते ट्विटरवर ट्रेंड

बिग बॉसच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेली ‘भाभीजी घर पे है’ मालिकेतील शिल्पा शिंदे अचानक ट्रेंडमध्ये आली आहे. सध्या कुठल्याही कामासंदर्भात अथवा मालिकेसंदर्भात काही बातमी नसताना ती ट्विटरवर चर्चिली जात आहे. तिच्या चाहत्यांच्या माध्यमातून शिल्पावर प्रशंसेचे शेकडो ट्विट करण्यात येत आहेत. हे सगळं अचानक कुठून सुरू झालं याचा मागोवा घेतला असता जे समोर आलं ते कळल्यावर तुम्हालादेखील आश्चर्याचा धक्का बसेल.

शिल्पा सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नाही. शिल्पा चर्चेत यावी असं काहीही झालं नसताना ती ट्रेंड एकाच कारणासाठी होत आहे ते म्हणजे तिचा वाढदिवस ऑगस्ट महिन्यात आहे. या महिन्याच्या २८ तारखेला तिचा वाढदिवस आहे. कुणीतरी ट्विटरवर शिल्पाचा या महिन्यात वाढदिवस असल्याचं सांगितलं. आणि बघता बघता मूळ विषय न बघता तिच्या चाहत्यांनी तिच्या कामाचं, बिग बॉसमधल्या तिच्या यशाचं कौतुक करण्याचा सपाटा लावला. शिल्पाशी संबंधित ट्विट बघून ज्यांना हे कुठून सुरू झालं याची कल्पना नव्हती त्यांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आणि बघता बघता शिल्पा शिंदे ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये आली.

एका चाहत्याने ‘शिल्पा शिंदे एक चांगली व्यक्ती आणि कलाकरही आहे’ असे लिहिले आहे.

एका चाहत्याने तर ‘असे असतात विजेते. फक्त नाव घेतले तरी टॉप ट्रेंडमध्ये येतात’ असे लिहित ट्विट केले आहे. शिल्पाच्या एका चाहत्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हे मूळ कारण जाणून न घेता चाहत्यांनी तिच्या कामाचं, बिग बॉसमधल्या यशाचं कौतुक करण्यास सुरुवात केली.

First Published on August 14, 2019 7:03 pm

Web Title: why shilpa shinde is trending on twitter avb 95
Just Now!
X