बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतीच हार्ले डेव्हिडसनची गुलाबी रंगाची बाईक खरेदी केली आहे. या बाईकचे छायाचित्र तिने इन्स्टाग्रामवर प्रसिध्द केले आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अॅब्राहम बाईकचा मोठा चाहता असल्याचे अनेकांना ज्ञात आहे. परंतु, व्हाय शूड बॉईज हॅव ऑल द फन? असा प्रश्न विचारत या जंगली बिल्लीने ही गुलाबी रंगाची हार्ले डेव्हिडसन बाईक आपल्या ताफ्यात शामिल केली आहे. हार्ले डेव्हिडसन ही अमेरिकन कंपनी असून, या कंपनीच्या बाईक्सचे जगात अनेक चाहते आहेत. अलीकडेच एका पारितोषिक वितरण सोहळ्याच्या ठिकाणी प्रियांका तिच्या नव्या रोल्स राईसमधून अवतरताना अढळून आली होती. आपल्या बेधडक व्यक्तिमत्वासाठी प्रसिध्द असलेल्या प्रियांकाकडे पोर्श कायेन, मर्सिडीझ बेन्झ ई क्लास, बीएमडब्लू 7 सिरिज आणि रोल्स राईस अशा एका पेक्षा एक भारी गाड्या ताफ्यात आहेत. आत यात हार्ले डेव्हिडस या शानदार बाईकची भर पडली आहे.