News Flash

‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद; पत्नीसाठी कपिलने घेतला महत्त्वाचा निर्णय

...म्हणून 'कपिल शर्मा शो' बंद होणार; खुद्द कपिलनेच केला खुलासा

छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा शो लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा कार्यक्रम बंद का होणार हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. या सगळ्या प्रश्नांवर कपिलने मौन सोडलं आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. करोनाचा फटका बसल्यामुळे हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, हा कार्यक्रम बंद करण्यामागे कपिलची पत्नी गिन्नी चतरथ असल्याचं दिसून येत आहे.

पाहा : वाहिनीसाहेबांच्या घरी युवराजांचे आगमन; धनश्री कडगांवकरला पुत्ररत्न

‘कपिल शर्मा शो’ बंद होणार असल्याचं समजताच चाहत्यांनी सोशल मीडियावर कपिलला टॅग करत विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यामध्येच एका चाहत्याने “कपिल सर, हा शो ऑफएअर का जातोय?” असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या प्रश्नावर कपिलने उत्तर दिलं असून त्याचं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.


“मला माझ्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पत्नीसोबत घरी काही वेळ व्यतीत करायचा आहे”, असं उत्तर कपिलने दिलं. विशेष म्हणजे या उत्तरातून तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं त्याने जाहीर केलं आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, ‘कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. अनेक चित्रपटांचं प्रमोशन या शोच्या मंचावर झालं आहे. त्यामुळे हा शो विशेष लोकप्रिय आहे. तसंच या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्याचंदेखील पाहायला मिळालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 9:09 am

Web Title: why the tv show kapil sharma show going offair kapil reveals truth ssj 93
Next Stories
1 वाहिनीसाहेबांच्या घरी युवराजांचे आगमन; धनश्री काडगांवकरला पुत्ररत्न
2 १० वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे बिग बींना आजही केले जाते ट्रोल
3 जेठालालच्या खऱ्या कुटुंबीयांना पाहिलेत का? पाहा फोटो
Just Now!
X