News Flash

…म्हणून टॉम क्रूजने परत केले तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार

गोल्डन ग्लोब 2022 सोहळ्याचं प्रसारण रद्द

(Photo : tomcruise / instagram )

हॉलिवूडच्या प्रसिद्ध गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2022 सोहळ्याचं भविष्य आज अडचणीत सापडलंय. कारण यूएस मास मीडिया नेटवर्क एनबीसीने पुढच्या वर्षीचा गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2022 पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण करणार नसल्याचं जाहीर केलंय. तर दुसरीकडे अनेक प्रतिष्ठित हॉलिवूड स्टुडिओ, तसंच टॉम क्रूज आणि स्कारलेट जोहानसन सारख्या बड्या स्टार्सनी त्यांना मिळालेले गोल्डन ग्लोब पुरस्कार आयोजकांना परत केले आहेत.

गेल्या आठवड्याभरात द हॉलिवुड फॉरेन प्रेस असोसिएशन विरोधात हॉलिवूडमध्ये आक्रोश वाढतच चालला आहे. याला समर्थन देत द हॉलिवुड फॉरेन प्रेस असोसिएशनविरोधात टॉम क्रूजने त्याला मिळालेले तीन गोल्डन ग्लोब्सचे पुरस्कार आयोजकांना परत केले आहेत. क्रूज़ यांना 1990 मध्ये ‘बॉर्न ऑन फोर्थ ऑफ जुलै’ या चित्रपटासाठी आणि 1997 मध्ये ‘जेरी मॅगुएरे’ साठी सर्वश्रेष्ठ अभिनेताचा सम्मान मिळाला होता. सोबतच 2000 मध्ये ‘मॅगनोलिया’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेताचा पुरस्कार मिळाला होता. हे तिन्ही पुरस्कार परत करून टॉम क्रूज यांनी द हॉलिवुड फॉरेन प्रेस असोसिएशनला विरोध दर्शविलाय.

द हॉलिवुड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) म्हणजेच एचएफपीए ही ९० आंतरराष्ट्रीय पत्रकारांची संस्था आहे. यातील ८७ पत्रकारांवर वंशद्वेश, लिंगभेदभाव, गुंडगिरी आणि भ्रष्टाचारांसारखे गंभीर आरोप आहेत. गेल्याच आठवड्यात या एचएफपीए असोसिएशनने विविधता आणि अन्य नैतिकतेच्या मुद्द्यांबाबत असलेला कमीपणा दूर करण्यासाठी संस्थेच्या सुधारणेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी मतदान केलं. या असोसिएशनमध्ये बदल घडवून पूर्णपणे सुधार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतू अजुनही या असोसिएशनला हॉलिवूडच्या अनेक स्टूडिओजना धमकावण्याच्या प्रकारांवर आळा बसवता आलेला नाही.

गेल्याच आठवड्यात नेटफ्लिक्स आणि अमेजॉन स्टूडियो या दोघांच्या वतीने एचएफपीए असोसिएशनला ताकीद देण्यात आली होती. जर एचएफपीए असोसिएशनमध्ये लवकरात लवकर बदल करून कठोर योजनांची अंमलबजावणी केली नाही तर पुढे जाऊन एचएफपीएसोबत संबंध तोडण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असं या दोन्ही स्टुडिओच्या वतीने सांगण्यात आलं होतं.

ही संस्था पुरस्कार आयोजित करते. हॉलिवूडमध्ये ब्लॅकलॅश मोठ्या प्रमाणात सुरू असून जोहानसन आणि मार्क रफ्फालो यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींची देखील या असोसिएशनने निंदा केली आहे. द हॉलीवुड फॉरेन प्रेस असोसिएशनच्या या कार्यपद्धतीमुळे या असोसिएशनला हॉलिवूडमधून बाहेर करावं, अशी मागणी गेल्या आठवड्याभरात जोर धरू लागली आहे.

तर स्कारलेट जोहानसन यांनी देखील त्यांना मिळालेले एकूण चार गोल्डन ग्लोब पुरस्कार परत केले आहेत. तसंच द हॉलिवुड फॉरेन प्रेस असोसिएशनपासून दूर राहण्याचा आग्रह देखील हॉलिवुडला केला आहे. तर दुसरीकडे गोल्डन ग्लोब विजेता मार्क रफालो यांनी “एक पाऊल पुढे टाकून भूतकाळ बदलण्याची योग्य वेळ आली आहे”, असं वक्तव्य करून त्यांनी ही आपला विरोध दर्शवलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 11:40 am

Web Title: why tom cruise has returned his 3 golden globes prp 93
Next Stories
1 “बॉलिवूडमध्येही लैंगिक भेदभाव”, अभिनेत्री दिया मिर्झाचा खुलासा
2 ‘तारक मेहता…’मधील ‘टप्पू’च्या वडिलांचे निधन
3 लेकीने चित्रपटात बोल्ड सीन दिल्यास संजय कपूरची असेल ‘अशी’ प्रतिक्रिया
Just Now!
X