१९६० सालापासून कारकिर्दीला सुरुवात करणारे धर्मेद्र वयाच्या ८२ व्या वर्षीही तेवढ्याच हरहुन्नरीने अभिनय करताना पाहायला मिळतात. अनेक चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय करुन त्यांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. आतापर्यंत २४७ चित्रपटांमध्ये काम करणा-या धर्मेद्र यांना काही विशिष्ट कारणामुळे आज बॉलिवूड एकदम परकं वाटू लागलं आहे.

धर्मेंद्र यांनी १९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील अनेक दशकं त्यांनी प्रेक्षकांवर आणि कलाविश्वावर अधिराज्य गाजवलं. मात्र, एवढं काळ लोटून गेल्यानंतरही त्यांना आज अचानकपणे एकटेपणाची भावना जाणवू लागली आहे. धर्मेद्र यांना  एकटेपणा का जाणवू लागला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.मात्र त्यांनी ट्वीटरवर एक जुना फोटो शेअर त्यांच्या एकटेपणामागील कारण स्पष्ट केले आहे.

शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये धर्मेंद्र यांच्याबरोबर राज कपूर, दिलीप कुमार आणि देवानंद दिसून येत आहेत. या फोटोला कॅप्शन देत ‘यांच्याशिवाय बॉलिवूडमध्ये काम करताना मला न्युकमरचा फिल येतो’ असं म्हटलं आहे. धर्मेंद्र यांची ही पोस्ट वाचून ते राज कपूर, दिलीप कुमार आणि देवानंद यांना किती मिस करतात ते दिसून येतं.

‘या तिन्ही कलाकारांबरोबर काम करताना विशेष आनंद व्हायचा. मात्र आज त्यांच्याशिवाय चित्रपटसृष्टीत काम करणं म्हणजे या क्षेत्रात पहिल्यांदाच पाय ठेवल्यासारखं आहे. आज या तिघांनाही मी मनापासून मिस करतो’, असंही त्यांनी या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

दरम्यान, भावनिक पोस्ट करणारे धर्मेंद्र पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत येण्यास सज्ज झाले असून ते  लवकरच ‘यमला पहला दीवाना : फिर से’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर सनी देओल आणि बॉबी देओल हेदेखील स्क्रिन शेअर करणार आहेत.