26 September 2020

News Flash

#LailaMajnu : ‘या’ कारणांसाठी लैला-मजनू एकदा पाहाच

इम्तियाजने ऐतिहासिक लैला मजनूची प्रेमकथा एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आणली .

प्रेमकथा रुपेरी पडद्यावर प्रभावीपणे मांडणारा दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अली ओळखला जातो. ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’, ‘हायवे’ यांसारख्या दमदार प्रेमकथा त्याने प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांनंतर त्याचा ‘लैला मजून’ हा चित्रपटही आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

इम्तियाजने ऐतिहासिक लैला मजनूची प्रेमकथा एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आणली असून या चित्रपटातील काही खास कारणामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

१. या चित्रपटाची मांडणी उत्तमरित्या करण्यात आली असून चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत या चित्रपटामध्ये वेगवेगळे रंग भरल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लोकप्रिय असलेल्या लैला मजनूच्या मूळ प्रेमकथेला कोठेही धक्का न लावता हे नवं कथानक तयार करण्यात आल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहे.

२. इम्तियाजने आतापर्यंत दिग्दर्शन केलेला प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे. त्यामुळे लैला मजनूही सुपरहिट ठरेल यात शंका नाही. या चित्रपटाला इम्तियाजने योग्य दिशा दाखविली असून एकता कपूरनेही या चित्रपटासाठी हातमिळविणी केली होती. एकता कपूरच्या ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ अंतर्गत या चित्रपटाची करण्यात आली आहे.

३. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून तृप्ती दिमरी आणि अविनाश तिवारी यांनी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असून त्यांनी भूमिकेला पूरेपुर न्याय दिल्याचं पाहायला मिळालं आहे. तर सुमित कौलने केलेल्या अभिनयामुळे या चित्रपटाला नवी रंगत आली आहे. त्यामुळे या तिन्ही कलाकारांसाठी हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.

४. चित्रपट यशस्वी होण्यामागे अनेक कारणं असतात. त्यातलंच एक मुख्य कारण म्हणजे चित्रपटाचं चित्रीकरण ज्या ठिकाणी होत आहे ती जागा. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्यामुळे याचं चित्रीकरणही अशाच रोमॅण्टीक ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 3:31 pm

Web Title: why you should watch imtiaz ali film laila majnu
Next Stories
1 निर्मल सोनी नवे ‘डॉ. हाथी’!
2 अभय -दिप्ती ठरले संजय जाधवसाठी ‘लकी’
3 ‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात चालणार श्रीसंतची खेळी
Just Now!
X