News Flash

…अन् मीराला शाहिदचा चेहरा दिसला

...त्यामुळे मीरा संभ्रमात पडायची.

shahid, meera
शाहिद कपूर, मीरा राजपूत कपूर

बॉलिवूडमध्ये सध्या ‘मोस्ट हॅपनिंग’ जोडप्याच्या यादीत अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर यांचे नाव घेण्यात येते. शाहिद आणि मीराच्या पहिल्या भेटीपासून ते विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावण्यापर्यंत त्यांच्या सर्व गोष्टींवर चाहत्यांची नजर असते. या सेलिब्रिटी जोडीविषयी सांगायच झाल तर चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नसताना मीराने शाहिदच्या करिअरशी जुळवून घेतलं. किंबहुना आता तीसुद्धा या चित्रपटसृष्टीचा एक भाग झाली असून, शाहिदच्या अनुपस्थितीतही बऱ्याच कार्यक्रमांना मोठ्या आत्मविश्वासाने हजेरी लावते.

शाहिदच्या करिअरमध्ये मीराही सध्या महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणापासून ते अगदी कुटुंबाचा सांभाळ करण्यापर्यंत सर्व गोष्टीत मीरा त्याला साथ देते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती शाहिदला पाठिंबा देत असते. पण, तुम्हाला माहितीये का, त्याच्या विविध लुक्समुळे क्वचितप्रसंगी मीरा संभ्रमात पडायची. कारण, चित्रीकरणाच्या निमित्ताने म्हणा अथवा अन्य कारणाने माध्यमांना टाळण्यासाठी शाहिद आपला चेहरा लपवायचा. यावेळी ‘पद्मावती’ चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेमुळे त्याला तसे करावे लागत होते.
चित्रपटातील आपला लूक सर्वांसमोर येऊ नये यासाठीच तो माध्यमांसमोर चेहरा लपवून वावरत होता. पण, आता मात्र तसे नाहीये. ‘पद्मावती’मधील शाहिदच्या भूमिकेवरुन पडदा उचलण्यात आल्यापासून तो मोकळेपणाने माध्यमांसमोर वावरु लागला आहे. इतकेच नव्हे तर त्याचा नवा लूकही सर्वांसमोरच आला असून, यात तो पूर्वीसारखाच दिसत आहे.

पाहा : VIDEO : ‘घुमर’ करत दीपिका म्हणतेय ‘दिसला गं बाई दिसला’

मीरानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहिदचा एक फोटो पोस्ट करत त्यासोबत एक कॅप्शनही लिहिली आहे. ‘मी त्याचा चेहरा पुन्हा एकदा पाहू शकतेय…’ असे कॅप्शन लिहित तिने यासोबत #hellohusband असा हॅशटॅगही दिला आहे. शाहिदचा हा मूळ लूक पत्नी मीरालाही भावतो हेच तिच्या पोस्टवरून लक्षात येते. मीरा आणि शाहिदची रिअल लाइफ केमिस्ट्री पाहता ही स्टार जोडी येत्या काळात चित्रपटातही एकत्र दिसली तर नवल वाटायला नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 12:15 pm

Web Title: wife mira kapoor revealed bollywood actor shahid kapoors new look from her instagram account
Next Stories
1 अखेर एकमेकांसमोर येणार सलमान – ऐश्वर्या
2 शाहरुखने दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास का दिला नकार?
3 TOP 10 NEWS : आर्चीच्या ‘त्या’ व्हिडिओपासून अनुष्काच्या क्रशपर्यंत..
Just Now!
X