12 December 2019

News Flash

अभिजीत बिचुकले पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार?

बिचुकलेंना अटक झाल्यापासून बिग बॉसची टीम साताऱ्यात ठाण मांडून बसली आहे.

अभिजीत बिचुकले

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चेक बाऊन्स बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. तर खंडणीच्या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हे सर्व घडत असतानाच आता अभिजीत पुन्हा बिग बॉसच्या घरात जाऊ शकेल का असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये उपस्थित होत आहे.

पहिल्या दिवसापासून अभिजीत बिचुकले विविध गोष्टींमुळे चर्चत होता. त्यामुळे शोच्या टीआरपीसाठी बिग बॉसची टीम त्यांना परत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. बिचुकलेंना अटक झाल्यापासून बिग बॉसची टीम साताऱ्यात ठाण मांडून बसली आहे. दुसरीकडे तक्रारदारानेच तक्रार मागे घेतल्याने बिचुकलेंना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

अभिजित बिचुकलेमुळे साताऱ्याचे नाव उंचावले जात होते आणि अभिजित बिचुकले असेच खेळत राहिले तर त्यांना बिग बॉसचे पारितोषिकही मिळेल अशी आशा असल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर बिचुकलेंची सुटका झाल्यास त्यांना बिग बॉसची टीम थेट घरात घेऊन जाऊ शकते.

First Published on June 25, 2019 10:58 am

Web Title: will abhijeet bichukale re enter in bigg boss marathi house ssv 92
Just Now!
X