पानी सिनेमा तयार झालाच तर आम्ही तो सिनेमा सुशांत सिंह राजपूतला समर्पित करु असं शेखर कपूर यांनी म्हटलं आहे.शेखर गुप्ता यांनी पानी सिनेमा तयार करण्याचं मनावर घेतलं आहे. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतची आठवण शेखर कपूर यांना आली आहे. शेखर कपूर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी पानी सिनेमा पूर्ण झालाच तर तो आम्ही सुशांतला समर्पित करु असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पानी हा सिनेमा सुशांत सिंह राजपूतचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याने इतर सिनेमाही त्यासाठी साईन केले नव्हते. मात्र १४ जून रोजी त्याने आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सगळी हिंदी सिनेसृष्टी हादरली होती. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर दोन आरोप होऊ लागले. एक आरोप झाला तो घराणेशाहीमुळे त्याचा बळी गेला आहे. तर दुसरा आरोप झाला तो म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील गटबाजीमुळे त्याचा बळी गेला. दरम्यान या प्रकरणात आत्तापर्यंत ३४ पेक्षा जास्त लोकांची चौकशी झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच शेखर कपूर यांनीही त्यांचा जबाब इमेलद्वारे नोंदवला होता. यशराजतर्फे पानी या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार होती. या सिनेमाचं दिग्दर्शन शेखर कपूर करणार होते. मात्र आदित्य चोप्रा आणि शेखर कपूर यांच्यात काही मतभेद झाले. त्यामुळे हा सिनेमा बंद पडला होता. सिनेमा बंद पडल्याचे समजताच सुशांतला खूप दुःख झालं होतं. या सिनेमात सुशांतची मुख्य भूमिका होती असंही शेखर कपूर यांनी स्पष्ट केलं होतं.