News Flash

सलमान-रणबीरमधील भांडण मिटणार?

गेल्या काही वर्षांपासून रणबीर - सलमानमध्ये शीतयुद्ध सुरू आहे.

रणबीर कपूर, सलमान खान

बॉलिवूडच्या ‘भाईजान’शी पंगा घेऊ नका असं म्हटलं जातं. सलमान खान अनेक कलाकारांसाठी या इंडस्ट्रीतला ‘गॉडफादर’ आहे. त्याच्याशी पंगा घेणं अनेकांना न परवड्यासारखं त्यामुळे त्याच्या वाकड्यात जाण्याचा कोणीही सहसा प्रयत्न करत नाही. याउलट सलमानशी टक्कर देणारेही इंडस्ट्रीत आहेत आणि त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता रणबीर कपूर. गेल्या काही वर्षांपासून रणबीर – सलमानमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. पण आता हे भांडण लवकरच मिटण्याची चर्चा होत आहे.

रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भट्टमुळे या दोघांमधील कटुता नाहीशी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामागचं कारण म्हणजे आलिया आणि सलमान येत्या काळात एकत्र चित्रपटात काम करणार आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘ईन्शाल्ला’ या चित्रपटात हे दोघे पहिल्यांदाच एकत्र झळकतील. आलिया या दोघांमधलं शत्रुत्व मिटवण्यासाठी काही प्रयत्न करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Video : वडिलांच्या तब्येतीविषयी रणबीरने व्यक्त केली काळजी; आलिया झाली भावूक

काही वर्षांपूर्वी सलमान आणि रणबीर यांच्यात एका क्लबमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं असं म्हटलं जातं. सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफवरून हे भांडण झाल्याची चर्चा होती. त्यानंतर अनेकदा सलमान-रणबीरने अप्रत्यक्षरित्या एकमेकांना टोमणे मारल्याचं पाहायला मिळालं. आता बऱ्याच वर्षांनंतर या दोघांमधील भांडण मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 4:30 pm

Web Title: will salman khan bury the hatchet with ranbir kapoor
Next Stories
1 कंगनापाठोपाठ आता ऐश्वर्यालाही व्हायचंय दिग्दर्शिका
2 बिग बॉस मराठी २: कोण आहेत स्पर्धक?, ओळखा पहिल्या अक्षरावरून
3 ‘भाग मिल्खा भाग’ नाकारल्याचा अक्षयला होतोय पश्चाताप
Just Now!
X