29 October 2020

News Flash

तेलुगू चित्रपटातून आर्यन खानचं पदार्पण; प्रभास, राणा डग्गुबत्तीसोबत करणार काम?

हा बिग बजेट चित्रपट 'बाहुबली'सारखाच भव्यदिव्य असणार आहे.

शाहरुख खान, आर्यन खान

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान याच्या मुलाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत बऱ्याच चर्चा आहेत. ‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी त्याने नुकताच आवाजसुद्धा दिला आहे. पण एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खान बॉलिवूड नाही तर टॉलिवूड चित्रपटातून पदार्पण करणार असल्याचं समजतंय. एका बिग बजेट तेलुगू चित्रपटासाठी त्याला विचारण्यात आल्याचं कळतंय. हा चित्रपट ‘बाहुबली’सारखाच भव्यदिव्य असणार आहे.

विशेष म्हणजे ‘बाहुबली’चे मुख्य अभिनेते प्रभास, राणा डग्गुबत्ती यांच्यासोबत आर्यन खान काम करणार असल्याची माहिती आहे. दिग्दर्शक गुणाशेखर यांनी आर्यनला चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी विचारले आहे. ‘हिरण्यकश्यपू’ असं चित्रपटाचं नाव असून हा यामध्ये तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्याही भूमिका आहेत.

Video : प्रिया वारियर त्याला किस करायला जाते अन्

या चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘द लायन किंग’मध्ये आर्यनने सिम्बा या भूमिकेसाठी आवाज दिला. त्याच्या या कामाची बरीच प्रशंसा झाली. आता अभिनेता म्हणून त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 5:28 pm

Web Title: will shah rukh khan son aryan khan make his south debut soon ssv 92
Next Stories
1 इंटरनेटवर मंदिरा बेदीच्या ‘त्या’ फोटोने खळबळ, चाहते झाले घायाळ
2 ‘छत्रीवाली’ मालिकेतील विक्रमच्या ‘कबीर सिंग’ लूकची चर्चा
3 विद्या बालन पहिल्यांदाच करणार या लघूपटाची निर्मिती
Just Now!
X