जगभरात अत्याधुनिक यंत्रमानव रोबोट सोफिया सध्या चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. कारण ती पूर्णतः माणसाप्रमाणे दिसते आणि एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळवणारी ती पहिलीच रोबोट आहे. सौदी अरेबियाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सोफियाला नागरिकत्व दिलं आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता विल स्मिथ याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विल स्मिथ सोफियासोबत ‘डेट’वर गेला असतानाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये दोघं गप्पा मारताना दिसत आहेत. पण गप्पा मारताना अचानक विल स्मिथ सोफियाला किस करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यावर सोफिया स्मिथला नकार देते आणि आपण चांगले मित्र बनू शकतो असं म्हणते. त्यानंतर ती स्मिथला डोळा मारतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ –

फेब्रुवारी महिन्यात सोफिया हैदराबाद येथे वर्ल्ड कांग्रेस ऑन इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये पोहोचली होती. येथे तिला बॉलिवूडच्या बाबतीत काही प्रश्न विचारण्यात आले. बॉलिवूडमधील आवडता अभिनेता कोण असा प्रश्न विचारतात शाहरूख खान असं उत्तर तिने दिलं होतं.

सोफिया चेह-यावरील हावभाव ओळखण्यासाठी आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. तसंच अनेक मीडिया चॅनल्सना इंटरव्यू देण्यासाठीही ती ओळखली जाते. हॅन्सन रोबोटीक्सने सोफियाची रचना केली आहे. रोबोट सोफियाला डेव्हिड हॅन्सन यांनी बनवलंय ते हॅन्सन रोबोटिक्सचे संस्थापक आहेत.