साऊथ सुपरस्टार महेश बाबूने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं अशी त्याच्या लाखो चाहत्यांची इच्छा आहे. ‘भारत अने नेनू’ हा त्याचा तेलुगू चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने घसघशीत कमाई केली. या यशानंतर महेश बाबू स्पेनमध्ये कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होता. तिथून परतताना त्याने मुंबईत एका बॉलिवूड निर्मात्याची भेट घेतल्याची जोरदार चर्चा होती. बॉलिवूड पदार्पणासाठी त्याने प्रयत्न सुरू केल्याचं म्हटलं जात होतं. आता त्याची पत्नी नम्रता शिरोडकरने याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं की, ‘सध्या तरी त्याची बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा नाही. त्याने मुंबईत एका बॉलिवूड निर्मात्याशी भेट घेतल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि तर्कहीन आहेत. बॉलिवूडचा विचारसुद्धा त्याच्या मनात नाही. मुंबईत तो हेअर स्टायलिस्ट हाकिम अलिमसोबत एका तेलुगू चित्रपटासाठी लूक टेस्ट देण्यासाठी थांबला होता.’

वाचा : कोण म्हणतं ‘पानिपत’ अडचणीत?- आशुतोष गोवारिकर 

नम्रताने केलेल्या या खुलासामुळे महेश बाबूच्या चाहत्यांची निराशा मात्र नक्कीच झाली आहे. मला चांगली ऑफर मिळाली तर मी बॉलिवूडचा विचार नक्की करेन असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र आता त्याचं बॉलिवूड पदार्पण लांबणीवर जाण्याची चिन्हं दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will south superstar mahesh babu debut in bollywood his wife namrata shirodkar has the answer
First published on: 19-06-2018 at 15:31 IST