News Flash

‘गोलमाल ४’ च्या चित्रीकरणाचा यावर्षी होणार श्रीगणेशा

करण जोहरसोबत 'राम लखन'च्या रिमेकवरही काम करतोय.

दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. गोलमालच्या सिरीजमधील चौथ्या चित्रपटाच्या चित्रीकरणास यावर्षी सुरुवात करणार असल्याचे रोहितने सांगितलेय.
दिलवालेच्या प्रदर्शनानंतर रोहितने ‘गोलमाल ४’ची कथा लिहण्यास सुरुवात केल्याचे तो म्हणाला. रोहित म्हणाला की, सध्या मी दोन चित्रपटांवर काम करत आहे. त्यातील ‘गोलमाल ४’ चे काम लवकरच सुरु होईल. तसेच मी करण जोहरसोबत ‘राम लखन’च्या रिमेकवरही काम करतोय. दोन्ही चित्रपटांच्या कथांवर सध्या काम चालू असून पुढील सहा महिन्यात त्यांच्या चित्रीकरणासही सुरुवात होईल. ‘गोलमाल ४’मध्येही अजय देवगण दिसण्याची शक्यता आहे. मात्र, ‘राम लखन’च्या रिमेकमध्ये कोणते चेहरे दिसणार याबाबत रोहितने मौन बाळगणे पसंत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2016 12:20 pm

Web Title: will start shooting golmaal 4 this year rohit shetty
टॅग : Rohit Shetty
Next Stories
1 गौरी शिंदेच्या चित्रपटात शाहरुख आणि आलिया; सेटवरील फोटो व्हायरल
2 व्हिडिओः पाकिस्तानी जाहिरातीत सोनम कपूर आणि फवाद खान
3 सिग्नेचर टय़ून, जिंगल्स ते शीर्षकगीते..
Just Now!
X