News Flash

‘द कपिल शर्मा शो’मध्ये रिंकू भाभी परत येणार? सुनीलचं सूचक ट्विट

भांडणानंतर सुनीलने 'द कपिल शर्मा शो' सोडला आणि तो पुन्हा परतलाच नाही.

सुनील ग्रोव्हर

कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर ही कॉमेडीतील सर्वोत्कृष्ट जोडी मानली जाते. भांडणानंतर सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला आणि तो पुन्हा परतलाच नाही. वर्षभराहून अधिक काळ होत आला आणि यादरम्यान सलमान खानपासून अनेकांनी सुनीलला परत आणण्यासाठी प्रयत्न केले. पण तो काही ऐकला नाही. कपिलनेसुद्धा त्याची माफी मागितली आणि शोचे दरवाजे त्याच्यासाठी नेहमीच खुले असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता सुनील या शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. कारण तसं सूचक ट्विट त्याने नुकतंच केलं आहे.

”प्रत्येक गोष्ट येणार आहे. काहीही कायमचे राहणार नाही. म्हणून फक्त कृतज्ञ राहा आणि हो, खळखळून हसा. बाकी… मेरे हस्बंड मुझको…,” असं ट्विट सुनीलने केलं आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनीलने साकारलेल्या रिंकू भाभीच्या भुमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. त्यादरम्यान त्याने एक म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित केला होता. ‘मेरे हस्बंड मुझको पियार नहीं करते,’ असे त्या गाण्याचे बोल होते. सुनीलच्या ट्विटमध्ये याच गाण्याचा उल्लेख पाहायला मिळतोय. त्यामुळे तो कपिल शर्माच्या शोमध्ये परतणार आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सुनीलसोबत झालेल्या वादानंतर कपिल शर्माने बऱ्याचदा प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं होतं. शोमधून सुनील बाहेर पडल्यानंतर कपिल शर्माला जणू उतरती कळाच लागली होती. कपिल शर्मा व्यसनाधीन झाला होता आणि सोनी टीव्हीने त्याला काही काळ विश्रांतीसाठीसुद्धा दिला. जवळपास वर्षभरानंतर तो कपिलने पुनरागमन केलं आणि सध्या त्याचा शो चांगलाच चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 6:25 pm

Web Title: will sunil grover return as rinku bhabhi on the kapil sharma show his tweet hints something is cooking ssv 92
Next Stories
1 देश महिलांसाठी सुरक्षित नाही हे न सांगण्यात कसली देशभक्ती?- रिचा चड्ढा
2 Photo : गणिताच्या जादूगार शकुंतला देवी यांच्या भूमिकेत विद्या; पाहा लूक
3 मिलिंद सोमणची छोट्या पडद्यावर वापसी, साकारणार ‘ही’ भूमिका