News Flash

मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या ‘त्या’ प्रस्तावाला प्रभास होकार देणार का?

त्यांनाही प्रभासच्या उत्तराची प्रतिक्षा

प्रभास

दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटांमुळे अभिनेता प्रभासच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला प्रभास ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ आहे यात काही शंकाच नाही. या चित्रपटांच्या यशानंतर त्याला अनेकांनी लग्नासाठी विचारल्याचं म्हटलं जातं. तर त्याची कथित प्रेयसी आणि ‘बाहुबली २’ चित्रपटातील सहकलाकार अनुष्का शेट्टीशी तो लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही बऱ्याच चर्चा झाल्या. या ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ला आता प्रसिद्ध मॅट्रिमोनियल वेबसाइट्सनी त्यांच्या प्रमोशनासाठी विचारणा केल्याची माहिती समोर येत आहे.

दोन मॅट्रिमोनियल वेबसाइट्सनी प्रभासला यासंदर्भात विचारले असून यासाठी भरभक्कम मानधनही देऊ केले आहे. मात्र, प्रभासने अद्यापपर्यंत या प्रस्तावाला होकार दिलेला नाही.

विराट- अनुष्काच्या लग्नातील रणबीर कपूरचा फोटो पाहिलात का?

प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याच्या वाढदिवशी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 3:21 am

Web Title: will the most eligible bachelor of india baahubali fame prabhas become the face of a matrimonial website
Next Stories
1 मीना कुमारीच्या बायोपिकमध्ये सनी लिओनीची वर्णी?
2 बहारदार ‘चतुरंगी’ कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
3 पाऊले चालती..
Just Now!
X