27 September 2020

News Flash

…म्हणून प्रिया वारियरने डिअ‍ॅक्टीव्हेट केले इन्स्टाग्राम अकाऊंट

नेमकं काय असेल कारण?

प्रिया वारियर (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)

प्रिया वारियर हे नाव आता सोशल मीडियाला नवीन राहिलेलं नाही. मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील एका व्हिडीओमुळे प्रिया रातोरात प्रकाशझोतात आली. त्यामुळे अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तिची चर्चा रंगली होती. नजरेने घायाळ करणाऱ्या प्रियाची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली होती. ‘विंक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. प्रियाने नुकतंच तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट केल्याचं सांगण्यात येत आहे.

‘इंडिया टुडे’नुसार, अलिकडेच प्रियाने ट्रोलिंगकडे आणि नकारात्मक चर्चा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसातच तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट केलं आहे. त्यामुळे प्रियाने अचानकपणे हा निर्णय का घेतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

पाहा : नजरेने घायाळ करणाऱ्या प्रियाचे ‘हे’ फोटो पाहून व्हाल थक्क

सध्या लॉकडाउन असल्यामुळे या वेळात कुटुंबियांना वेळ देता यावा यासाठी प्रिया सोशल मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट करण्याचा निर्णय घेतला. प्रिया नॅशनल क्रश असून तिचे सोशल मीडियावर अफाट चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ७ मिलिअनपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. दरम्यान, इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट करण्यापूर्वी तिने मल्याळम भाषेत एक व्हिडीओ शेअर केला होता. प्रियाने आतापर्यंत तामिळ, तेलुगु, मल्याळम या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 1:16 pm

Web Title: wink girl priya prakash varrier deactivates her instagram account ssj 93
Next Stories
1 ..अन् ‘तारक मेहता..’च्या सेटवरच जेठालाल व बबितामध्ये झाला वाद
2 Video: प्रियांकाने केसांचं केलय तरी काय? चाहत्यांना पडला प्रश्न
3 शिल्पाची लेक झाली ३ महिन्यांची; शेअर केला ‘हा’ सुंदर फोटो
Just Now!
X