रविवारी मुंबईत मराठी फिल्मफेअर सोहळा पार पडला. यात अनेक मराठी चित्रपटांनी, कलाकारांनी विविध विभागांसाठी पुरस्कार जिंकले. या सोहळ्याचं सूत्रसंचालन अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांनी केलं. चला तर पाहूयात, कोणी कोणी किती पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत…

बॉलिवूड अभिनेता दिपक डोब्रियाल यानं संजय दत्तच्या ‘बाबा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि आल्या आल्याच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मानही पटकावला. ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. ही संध्याकाळ गाजवली ती ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने. या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान तर पटकावलाच पण त्यासोबतच या चित्रपटाला एकूण अजूनही काही पुरस्कार मिळाले आहेत.
ते खालीलप्रमाणेः

१. सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ
२. सर्वोत्कृष्ट अभिनेता(समीक्षक)- ललित प्रभाकर
३.सर्वोत्कृष्ट अभिनेत्री(समीक्षक)- भाग्यश्री मिलिंद
(हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)- सोनाली कुलकर्णी (हिरकणी)
४. सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- सौरभ भालेराव, हृषिकेश दातार, जसराज जोशी
५. सर्वोत्कृष्ट पटकथा- करन शर्मा
६. सर्वोत्कृष्ट संवाद- इरावती कर्णिक
७. सर्वोत्कृष्ट निर्मिती संयोजन- सुनील निगवेकर, निलेश वाघ
८. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- आकाश अगरवाल
९. सर्वोत्कृष्ट एडिटींग- चारूश्री रॉय
खारी बिस्कीट या चित्रपटानंही या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.
१. सर्वोत्कृष्ट बालकलाकार- आदर्श कदम, वेदश्री खाडिलकर
२. सर्वोत्कृष्ट लिरिक्स- क्षितीज पटवर्धन
३. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- आदर्श शिंदे

या सोबतचः
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)- शिवानी सुर्वे (ट्रिपल सीट)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)- शुभंकर तावडे (कागर)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शन)- सलील कुलकर्णी (वेडिंगचा शिनेमा)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)- बाबा
मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी महेश कोठारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- शशांक शेंडे (कागर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नीना कुलकर्णी (मोगरा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- शाल्मली खोलगडे (गर्लफ्रेंड)
सर्वोत्कृष्ट कथा- मनिष सिंग (बाबा)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- सौरभ भालेराव (गर्लफ्रेंड)
सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन- निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (फत्तेशिकस्त)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- राहुल ठोंबरे, संजीव हवालदार (गर्लफ्रेंड- माझी स्टोरी, क्युटवाली स्वीटवाली लव्हस्टोरी)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- पौर्णिमा ओक (फत्तेशिकस्त).