News Flash

‘नोटीस मागे घे नाहीतर..’, कंगनाचा हृतिकला निर्वाणीचा इशारा

हृतिकने पाठवलेली नोटीस त्याने मागे घेतल्यास या प्रकरणाला पूर्णविराम देण्याची कंगनाची तयारी

आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेली नोटीस हृतिकने मागे घ्यावी नाहीतर त्याने कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहावे, कंगनाचा इशारा

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेली नोटीस हृतिकने मागे घ्यावी नाहीतर त्याने कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहावे, असा निर्वाणीचा इशारा कंगनाच्या वकीलांकडून हृतिकला देण्यात आला आहे. याशिवाय, हृतिक या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील कंगनाने केला आहे.

दरम्यान, हृतिकने पाठवलेली नोटीस त्याने मागे घेतल्यास या प्रकरणाला पूर्णविराम देण्याची तयारी कंगनाने दर्शविली असल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले. कंगनाने मध्यंतरी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ह्रतिकचा उल्लेख सिली (मुर्ख) एक्स असा केला होता. या बदनामीकारक उल्लेखाबद्दल कंगनाने बिनशर्त माफी मागावी, यासाठी ह्रतिककडून गेल्या महिन्यात कंगनाला नोटीस पाठविण्यात आली होती. कंगनानेही या नोटीसीला जशास तसे उत्तर दिले होते. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी पाठविलेल्या नोटीसमध्ये माझ्या अशिलाने ‘सिली एक्स’चा उल्लेख करताना कुठेही ह्रतिक रोशनचे नाव घेतले नसल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापही हृतिककडून नोटीस मागे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस आणखी चिघळत चालले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 4:17 pm

Web Title: withdraw notice or face action kanganas lawyer to hrithik
टॅग : Hrithik Roshan
Next Stories
1 ‘सरबजीत’चे नवे पोस्टर प्रसिद्ध
2 Video: One Night Stand चित्रपटातील बोल्ड सनीच्या ‘इजाजत’ गाण्याचा व्हिडिओ प्रसिध्द
3 नवाजुद्दीन सिद्दीकीचा पहिला म्युझिक व्हिडिओ ‘इश्क अनोखा’
Just Now!
X